कुत्रोबा ग्राम दैवत असणारे नाईचाकूर
भारतीय संस्कृती ही भूतदया जोपासणारी संस्कृती आहे. आपल्या थोर संत, महात्म्यांनी सुध्दा वेगवेगळ्या प्रसंगातून, माध्यमातून हाच संदेश दिला आहे. त्यात भगवान श्रीकृष्ण असोत अथवा ससिक रक्षण करणारे आदुसेने कुत्र्यास का मारले म्हणून खेद व्यक्त करणारे चक्रधर स्वामी असोत किंवा "भूता परस्परे जो मैत्र जिवांचे म्हणनारे ज्ञानेश्वर महाराज अथवा कुत्र्याचे पोट नुसती पोळी खाल्ले तर दुखेल म्हणून तुपाची वाटी घेवून कुत्र्याच्या पाठीमागे धावणारे नामदेव महाराज असोत. भुतांचे पालन करा म्हणनारे संतश्रेष्ठ तुकोबाराय हे सर्वजन प्राणीमात्राचे संगोपन करण्याची शिकवण देतात. या संताची शिकवण जोपासणारे गाव म्हणजे धाराशिव जिल्ह्यात उमरगा तालुक्यातील स्वता:ची वेगळी ओळख जोपासणारे 'नाईचाकूर' नाईचाकूर हे गाव तसे पाहिले तर महाराष्ट्र- कर्नाटक सीमावर्ती भागात व निजाम स्टेट मधील एक महत्वाचे गाव. या गावच्या नावाचा इतिहास हाच एका दंत कथेवर मोठा मनोरंजक आहे. 'नाई' या मुळच्या कन्नड शब्दाचा अर्थ कुत्रा असा होतो. म्हणजे कुत्राच्या नावाची ओळख जोपासणारे गाव म्हणजे नाईचाकूर. चाकूर...