मुलांनो तुमच्यासाठी.......
करोना विषाणू संसर्गामुळे शाळांना सुट्टया लागल्याने पालकांनी ही याची काळजी घेऊन मुलांना घराबाहेर जाण्यास मज्जाव केला आहे. मुल घराबाहेर म्हणजे समुहात खेळायला जाणे होते. यातून संसर्गजन्य स्थिती उदभवू नये. मुलं दिवस भर घरात थांबून कंटाळवाणे होत असेल. सुट्टीच्या कालावधीत नेहमी शिबिरे, विविध छंद वर्ग, शिबिरे, सहपरिवार सहली, संग्रहालये, प्रेक्षणीय ठिकाणे मुलांना दाखवणे असे नियोजन पालक करत असतील पण करोनाच्या संसर्गामुळे हे सर्व बंद केले. घराच्या बाहेर जायचे नाही म्हणून काय झाले आम्ही घरीच मुलांच्या व्यक्तीमत्व विकासासाठी अनेक कार्यक्रम/उपक्रम करून घेऊयात. मुलांकडून अवांतर वाचन करून घेता येईल. तोचतोचपणा घालवण्यासाठी नेटवर मुबलक साहित्य पीडीएफ च्या रूपात उपलब्ध आहे. अनेक गाजलेल्या कांदब-या, गूढकथा, प्रवास वर्णने, आत्मचरित्र, युद्ध कथा, तसेच अनुवादित साहित्य इ. प्रतिभावान लेखकांच्या साहित्यांचा आस्वाद वाचकांना घेता येईल. छात्रप्रबोधन मासिकांचे दर्जेदार जुने अंक ही त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. दररोज काही तरी लिहावे. आपले अनुभव...