पोस्ट्स

जानेवारी, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

महाराजसाहेब शाहजीराजे

इमेज
   अखंड हिंदूस्थानातील हिंदू समाज शेकडो वर्षे स्वाभिमान हरवून बसला होता. या समाजातील युवकांच्या मनगटातील बळ निघून गेले होते. या युवकांना ज्यांनी सारं काही पुन्हा मिळवून दिलं. महाराष्ट्राच्या मातीत पुन्हा स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित केली असे राजे म्हणजे म्हणजे छत्रपती शिवाजीमहाराज !!  शिवाजीमहाराजांच्या पाठीमागे समर्थपणे उभे राहून राष्ट्रीय भावना पेरणारे आणि स्वराज्यनिर्मितीची प्रेरणा देणारे व्यक्तीमत्व म्हणजे त्यांचे पिताश्री महाराजसाहेब शाहजीराजे!!  स्वराज्य संकल्पक शाहजी महाराजांचा जीवन प्रवास म्हणजे एक धगधगते यज्ञकुंडच.15 व्या शतकामध्ये संपूर्ण भारतभूमीवर परकीयांचे राज्य होते. दिल्लीमधून राज्य करणारे मुघल हे दक्षिणेतील प्रमुख सत्ताकेंद्र होते. याच बरोबर आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही या मुस्लिम राजवटी राज्य करत होत्या. संपूर्ण भारतभर मुसलमानांचे राज्य असले तरीही त्यांच्यात कमालीचे वैर होतेच.त्याला शिया-सुन्नी वादाचाही किनार होती. यांच्यात सतत दुसऱ्यांचा प्रदेश घेण्याचे मनसुबे केले जात.या सत्ता संघर्षात बळी जायचा इथल्या हिंदुंचा!! या भूमीचे खरे मालक...