पोस्ट्स

तीन दिवसीय अभ्यास दौरा - प्रेरक अनुभव

इमेज
 *तीन दिवसीय अभ्यास दौरा - प्रेरक अनुभव*  ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण ठिकाणे पाहण्यासाठी अभ्यास करण्यासाठी शासनाच्या वतीने अविष्कार भारत योजनेअंतर्गत रचना करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील 65 विद्यार्थी व सोबत त्यांच्यासाठी कष्ट करणारी शिक्षक कर्नाटक राज्यातील बेंगलोर या ठिकाणी अभ्यास दौरा जाणार आहे अशी माहिती मिळाली. तसेच यासाठी माझी ही निवड झाली ही आनंदाची बातमी माझ्या घरातील आई-बाबा यांना दिली आनंदाने आम्ही प्रवासाची तयारी करत होतो आणि तो दिवस आला.       27 फेब्रुवारी 2025 रोजी आम्ही खामसवाडी गावातून प्रवासाला सुरुवात केली. माझ्यासोबत गावातील आठ विद्यार्थी व आमच्या शिक्षिका गीतांजलीताई लोभे यांची पण निवड झाली होती. जिल्हा ठिकाणी आम्ही पोहोचलो. प्रवासाला निघण्यापूर्वी अभ्यास सहलीतील जिल्ह्यातील सर्व मुलां मुलींची ओळख झाली. सर्वांना एकसारखे कपडे व टोपी , ओळखपत्र , गटरचना करून तयार आमच्या झाली.  जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी मा. अशोकराव पाटील सर व जिल्हा परिषद धाराशिव चे मुख्य क...

जीवन जगण्याची कला शिका.- सहसरकार्यवाह डॉ. मनमोहनजी वैद्य

  हरंगुळ (बु) येथील जनकल्याण निवासी विद्यालयात स्व.बाळासाहेब देवरस भवन या अत्याधुनिक सभागृह, ब्रह्मार्पण भोजन कक्ष, नांलदा अध्ययन अनुसंधान केंद्र व संस्था प्रशासकीय कार्यालय इ.समावेश असलेल्या वास्तूचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.  यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह डॉ. मा.श्री मनमोहनजी वैद्य, लातूरचे खासदार मा. श्री सुधाकरजी श्रृंगारे, रा.स्व.संघ, जनकल्याण समितीचे प्रांताध्यक्ष डॉ. रविंद्रजी साताळकर, प्रकल्प अध्यक्ष प्रकाशजी लातूरे,संघचालक संजयजी अग्रवाल उपस्थित होते.  डॉ.मनमोहनजी यांनी मार्गदर्शन करताना लातूर पॅटर्न हा कोट्यानंतर प्रसिद्ध पॅटर्न आहे. स्पर्धेच्या युगा त जनकल्याण चे विद्यार्थी गतिमानतेने काम करतात. मात्र ,या पळण्यातून दमछाक होते. जीवन कशाकरता हा विचार आवश्यक. डॉक्टर इंजिनीयर बनण्याचे स्वप्न असू शकते ते जीवन जगण्यासाठीचे साधन आहे.ते ध्येय नाही. आपले ध्येय जीवनाची सार्थकता करण्याचे हवे. समाज परिवर्तनासाठी सर्वांनी आपले योगदान दिले पाहिजे. यात सर्व प्रकारचे लोक आपले योगदान देऊ शकतात. समाजाची हीच खरी गरज आहे. समाजचक्र गतिमान राहण...

मराठवाडा मुक्तीसंग्रामात नाईचाकूरचे योगदान

इमेज
१५ ऑगस्ट १९४७ ! भारताला स्वातंत्र्य मिळाले,पण हैदराबाद संस्थान मात्र अजूनही पारतंत्र्याच्या अंधकारात होते. परवशतेचा पाश अधिक घट्ट होऊ पाहत होता,पण मराठवाड्यातील जनतेने निजामाची जुलमी राजवट उखडून टाकली,त्यासाठी मोठा संघर्ष केला "रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले?" या न्यायाने संघर्षामुळेच हैदराबादेवर तिरंगा फडकला,यात स्वातंत्र्यलढ्यात उस्मानाबाद जिल्ह्यातील नाईचाकुर गावाचा सहभागही मोलाचा होता. भारताला स्वातंत्र्य मिळाले तरी हैद्राबाद संस्थानात निजामी जुलमी राजवट होती. त्यांनी हिंदूवर अनंत अत्याचार केले जात होते. निजामाने आपल्या अत्याचारांसाठी वापर केला. तो 'इत्तेहादुल मुसलमीन' संघटनेचा कासिम रझवी याने या अंतर्गत 'रझाकार' नावाची संघटना काढली. ही निमलष्करी संघटना होती. सैनिकी वेश परिधान करून धारदार फावडे हातात घेऊन रझाकार फिरायचे. मुलींची अब्रु असुरक्षित झाली होती. बलात्कार करणे, एकटयास गाठून हत्या इत्यादी कृत्य रझाकार करत होते. अशा या जुलमी रझाकार संघटेनेचा प्रमुख कासिम रझवी होता. एकार्थाने तो हिंदूंचा कर्दनकाळच म्हणावा लागेल. धर्माच्या नावाखाली चालणा...

*आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक*

इमेज
आपण जेव्हा भारताच्या इतिहासाची पाने उलटतो तेव्हा इतिहासाच्या अंधार्या गुहेतुन उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या शौर्याची प्रखर किरणे दिसतात.    देशावर इंग्रजांची जुलमी राजवट होती साधनसंपत्तीची लूट ,जबरदस्तीने धर्मांतर यामुळे त्रस्त झालेल्या रयतेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सगळ्याच जाती-जमातींनी संघर्ष केला. या सर्वांमध्ये ब्रिटिश काळात क्रांतीची मशाल पेटवली ते आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक यांनी !   उमाजींचा जन्म पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यातील भिवडी या गावी दि. ७ सप्टेंबर १७९९ रोजी रोजी झाला. दादोजी खोमणे आणि लक्ष्मीबाई हे त्यांचे आई-वडील होते. जेजुरीचे मल्हारी मार्तंड खंडोबा हे उमाजी नाईक यांचे आराध्य दैवत होते . याच ठिकाणावरून त्यांनी इंग्रजांविरुद्ध क्रांतीचा वणवा पेटवला.   १८२१ साली झालेल्या रामोशी समाजाचा इंग्रजांविरुद्ध पहिला उठाव होता. या लढ्याचे नेतृत्व उमाजीनी केले. देशव्यापी क्रांतीचे स्वप्न पाहणारा इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारा निधड्या छातीचा वीर आद्यक्रांतीकारक म्हणजेच उमाजी नाईक.  महाराष्ट्रातील रामोशी समाजाची वस्ती ही डो...

हिंदुनृपती श्री शाहूछत्रपती

इमेज
अखंड हिंदुस्थानचे हिंदुपदपातशाह, हिंदवी स्वराज्याचे हिंदवी साम्राज्यात रुपांतर करणारे छत्रपती शाहू महाराज! छ.शंभुराजांचे सुपुत्र शाहूंचा जन्म महाराणी येसूबाई यांच्या पोटी 18 मे 1682 रोजी रायगड जिल्ह्यातील गांगवली येथे झाला. त्यांचे मूळ नाव "शिवाजी" असेच होते.  त्यांचे बालपण रायगड किल्ल्यावर फुलत होते. मुगल बादशाह औरंगजेब आपल्या प्रचंड सैन्यानिशी दक्षिणेत आला. दक्षिणेतील हिंदवी स्वराज्य नष्ट करण्याचा त्याचा हेतू होता.हिंदुंचे स्वराज्य जिंकण्यासाठी आपल्या सर्वशक्तीनिशी औरंगजेब स्वराज्यातील किल्ले ताब्यात घेण्यासाठी धडपडत होता. औरंगजेबाशी मोठ्या आत्मविश्वासाने छत्रपती शंभुराजे संघर्ष करत होते.पण फितुरीने ते संगमेश्वर येथे मुघलांच्या हाती लागले. शेख निजाम उर्फ मुकर्रबखान याने संगमेश्वरावर छापा घालुन शंभुराजांना कैद केले. छत्रपती संभाजी महाराज यांची अत्यंत हालहाल करुन औरंगजेबाने हत्या केली. त्यांच्या हत्येनंतर झुल्फिकारखान उर्फ इतिकादखान याने रायगडाला वेढा दिला होता.अखेर महाराणी येसूबाई यांना राजपुत्र बाल शाहू यांच्यासह कैद झाली.सुमारे 17 वर्षे मोगलांच्या न...

नविन प्रवेश

*नवीन प्रवेश    नवीन प्रवेश    नवीन प्रवेश*        *रा.स्व.संघ जनकल्याण समिती संचलित जनकल्याण निवासी विद्यालय हा सामाजिक शैक्षणिक प्रकल्प आहे. मध्यमवर्गीय, शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी. त्यांना संस्कारक्षम शिक्षण मिळावे या उद्देशाने कार्यरत आहे.*   *माफक शुल्कात समाज दातृत्वाच्या आधारे ९.५ एकरच्या निसर्गरम्य परिसरात हरंगुळ बु लातूर येथे प्रकल्प स्थित असून प्रकल्प संकुलात  विद्यालय, वसतिगृह व वसतिगृह कर्मचारी निवास अशी व्यवस्था आहे.*    *विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबतच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यालय व वसतिगृहात वेगवेगळे कार्यक्रम- उपक्रम प्रशिक्षण यांचे आयोजन केलेले असते.*  *वर्गात व निवासात  मर्यादित विद्यार्थी संख्या, वसतिगृहात स्वतंत्र अशी पालक पर्यवेक्षक व्यवस्था व स्वयंअध्ययन रचना असते.* https://forms.gle/3Bq2CYo2SpHX67X17

आत्मउमेदीची गुढी || 💐 -प्रवीण दवणे

इमेज
|| आत्मउमेदीची गुढी || 💐                                                    -प्रवीण दवणे          यंदाची गुढी  ही आत्मउमेदीचे, वर्तमानाचे आव्हान आम्ही पेलणारच ह्या अजिंक्य मानसिकतेचे प्रतीक असणार आहे.        चेहेऱ्यावर  सणासुदीचा आनंद सहज दिसण्याला आता  'मास्क 'चा आडपडदा  असणार आहे.   हर्षाने उल्हसित, स्वागतयात्रा काढणाऱ्या लेझिम नि जयघोषात नाचतगात निघालेल्या  तरुणाईला गॅलरीतून बघण्याची ओढ  गुढीलाही लागलेली असते. मधुर गाठयांची नि गेंदेदार हळदी झेंडूची माळ, गर्भरेशमी  वस्त्राबरोबर ,  सजण्याची  नि मिरवण्याची मिरास यंदा नाही. हे सगळं खरंय, पण सकारात्मक  ऊर्जेचे ,विश्वात्मक प्रार्थनेचे बळच तिमिराला दूर सारून जिंकते. या एकात्मक मनांचे प्रतीक म्हणून यंदाची गुढी  आपण उभारायची आहे.            प्रार्थनेत एक सुमंगल बळ असतं. यंदा ज...