पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जागतिक मराठी भाषा दिन

इमेज
२७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे कुसुमाग्रजांचा जन्मदिन आहे. हाच दिवस मराठी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. यासाठी मराठी अकादमी ने पुढाकार घेतला. कुसुमाग्रजांचे विपुल साहित्य आहे. याचाच गौरव म्हणून आहे.   जगातील अनेक भाषेचा जन्म हा संस्कृत भाषेपासून झाला आहे. आपली मराठी भाषा देखिल संस्कृत भाषेमधून निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील जनतेला मराठी मायबोली वाटते.  मराठी भाषा एकच आहे पण दर बारा कोसावर भाषेत बोलण्याची पद्धत वेगळी जानवते. मराठवाड्यातील वेगळी, कोकणातील कोकणी, खानदेश तील आयराणी तसेच जिल्हा जिल्ह्यातील भाषेत बदल दिसतो.     पण आता शालेय अभ्यासक्रमात जसे सेमी माध्यमातून अर्ध्य  इंग्रजी व अर्ध्य मराठी या प्रमाणे मराठी भाषेचे होत आहे. बोली भाषेत सुध्दा इंग्रजी, हिंदी शब्दाचा वापर वाढला आहे.  समाजमाध्यमावर संवाद करताना इंग्रजीतून मराठी बोलली जाते. तेही अर्ध्यवट शब्दाचा वापर केला जात आहे.  मराठी भाषिक प्रांतात मराठी बोला, लिहा चळवळ काढावी लागते या पेक्षा दूरभाग्य काय असु शकते. अन्य भाषा नक...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे पाईक व्हा.- शिवराज ढोलगे

इमेज
हरंगुळ बु येथील जनकल्याण निवासी विद्यालयात शिवजयंती उत्साहाने साजरी करण्यात आली.  व्यासपीठावर बाल शिवाजी वेशात समर्थ भिसे तर राष्ट्रमाता जिजाऊ रूपाने गायत्री शेळके तर प्रमुख वक्ते शिवराज ढोलगे होते.  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिवराज ढोलगे म्हणाले, विद्यार्थी मित्रानो, महाराजा सारखी दाडी वाढवण्यापेक्षा विचार वाढवा. शिवचरित्र, अभ्यासून महाराजांच्या काही गुणांचे अनुकरण करा असे मत मांडले.  यावेळी मुख्याध्यापक, प्रशासकीय अधिकारी, अधीक्षक, पर्यवेक्षक, शिक्षक आदि ची उपस्थिती होती.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर कद्रे यांनी केले. तर कार्यक्रमाचे नियोजन ९वी ब ने केले होते.

विद्यार्थी मित्रांनो प्रशासकीय यंत्रणेत जा- जिल्हा परिषद अध्यक्ष राहूल केंद्रे

इमेज
हरंगुळ बु येथील जनकल्याण निवासी विद्यालयाच्या वार्षिकोत्सवातील कलाविष्कार कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष राहूल केंद्रे बोलत होते की, प्रशासकीय यंत्रणेत काम करण्यासाठी अभ्यास करून मोठे व्हा.तसेच विविध कलागुणांना व्यासपीठ मिळवून देवून जोपासना केली पाहिजे आणि जनकल्याण विद्यालयाने सांस्कृतिक कलाविष्कारात वेगळे पण निर्माण केले आहे म्हणत कौतुक  केले.  व्यासपीठावर विनोदवीर बालाजी सुळ,प्रकल्प अध्यक्ष प्रकाशराव रायचुरकर, वसतिगृह समिती अध्यक्ष राजेश सुगरे, वार्षिकोत्सव प्रमुख रघुनाथ पाटील उपस्थित होते.   महाराष्ट्राचा विनोदवीर बालाजी सुळ यांनी मनोगत व्यक्त केले.  सांस्कृतिक कार्यक्रमात विविध प्रकारच्या ११ कला प्रकाराचे सादरीकरण करण्यात आले.  हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रघुनाथ पाटील, हनुमंत पांचाळ, नरसिंग सुरवसे,विद्या कुलकर्णी, अपर्णाताई  शिलवंत , प्रदिप मुसांडे यांनी प्रयत्न केले.  कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये विविध ११ कला प्रकार सादर करण्यात आले.कलाविष्कार मधील मर्द मराठा गीतावरील नृत्य,...

व्हॅलेंटाईन डे चे सत्य

इमेज
अनेक वर्षांपासून शाळा, महाविद्यालयीन युवक -युवती मोठा प्रमाणात हा दिवस साजरा करण्यात धन्यता मानतात. आपल्याला प्रिय वाटणा-या व्यक्ति ला गुलाबाचे फुल देऊन  त्याच्यावरील प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणून साजरा करतात. पण वास्तव वेगळेच आहे. काही वर्षांपूर्वी दैनिकात वाचनात आले होते.    ही गोष्ट रोमन साम्राज्य होते त्या वेळची आहे. त्या काळी रोमन सैनिक जगातील विविध देशात युध्दासाठी जात असत. यामुळे सैनिकाचे लग्न होत नसत. युवक सैनिक असल्यामुळे लग्न होणे कठीण होत असे. काही सैनिक अस्वस्थ होत आणि वाईट मार्गाला लागत होते. ही बाब व्हॅलेंटाईन नावाच्या धर्म गुरूच्या लक्षात आले. अशा अनुरूप मुलीच्या शोध घेऊन अशा सैनिकांचे लग्ने जमवून दिली. हे सैनिक कुटुंबे सुखी राहू लागले. म्हणून अशा जोडप्यांनी व्हॅलेंटाईन यांचा जन्मदिन 'सेंट व्हॅलेंटाईन ' म्हणून साजरा करू लागले.   या दिवशी आपल्या जोडप्याला गुलाबाचे फुल देऊन साजरा केला जाणारा हा दिवस आजचे युवक साजरा करण्यात धन्यता मानत आहेत.   आजच्या युवा वर्गाने हा दिवस आपण कोणाच्या स्मरणार्थ करतोय.  हा दिवस का साजरा क...

समाजाची बांधिलकी जपून काम करणारे जनकल्याण निवासी विद्यालय-प्रांत संघचालक मधुकरराव जाधव

इमेज
हरंगुळ (बु) समाजाची बांधिलकी जपून काम करणारे हे जनकल्याण निवासी विद्यालय आहे. यातून तयार होणारे विद्यार्थी हे या राष्ट्राचा वैभव होऊन रोजगार न घेता रोजगार देणारे व्हा. येथील शिक्षणातून सक्षम, स्वालबनामधून  अहंकार, नैराश्य, दूर होते. तसेच संवेदनशील माणुस म्हणुन आपले व्यक्तीमत्त्व घडवण्याची व्यवस्था केली जाते असे जनकल्याण निवासी विद्यालयातील वार्षिकोत्सव समारोप कार्यक्रमात व्यक्त केले. जनकल्याण निवासी विद्यालयाच्या वार्षिकोत्सव समारोप कार्यक्रमाच्या व्यासपीठावर प्रमुख अतिथी नॅचरल समुहाचे बी. बी. ठोंबरे, मुंबई चे माजी आयकर आयुक्त संतोष जी साहू, रा. स्व. संघाचे देवगिरी प्रांत संघचालक मधुकरराव जाधव(दाजी), प्रांत उपाध्यक्ष रमेशराव जोशी,   प्रकल्प अध्यक्ष प्रकाशराव रायचूरकर, प्रकल्प कार्यवाह मधुकरराव कुलकर्णी, प्रशासकिय अधिकारी रविंद्र पुर्णपात्रे, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सोनटक्के, अधिक्षक शर्मिष्ठा कुलकर्णी ,वार्षिकोत्सव प्रमुख रघुनाथ पाटील  उपस्थित होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आपले मनोगत व्यक्त करताना श्री ठोंबरे म्हणाले भारतीय शिक्षण देणारे हे विद्यालय आह...

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे केंद्र जनकल्याण निवासी विद्यालय - सुरेशजी पाटील

इमेज
हरंगुळ(बु) जनकल्याण निवासी विद्यालयातील विविध कार्यक्रम, उपक्रमातून विद्यार्थ्याचा सर्वांगिण विकास होत असतो. म्हणून येथे प्रविष्ट विद्यार्थी हा भाग्यवान आहे . असे प्रतिपादन वार्षिकोत्सव उद्घाटन प्रसंगी संवेदना प्रकल्पाचे कार्यवाह सुरेश दादा पाटील यांनी केले.      जनकल्याण निवासी विद्यालयाचा २६वा वार्षिकोत्सव कार्यक्रमाच्या उदघाटन कार्यक्रमासाठी  व्यासपीठावर वार्षिकोत्सवाचे उदघाटक भांजीभाई पटेल(सरस्वती सॉ मिल, लातूर) पुणे जनता बॅक शाखा अधिकारी मनोजजी मेंडजोगी, जनकल्याण समिती प्रांत उपाध्यक्षा पद्माताई कुबेर, प्रमुख वक्ते सुरेश पाटील, प्रकल्पाध्यक्ष प्रकाशराव रायचूरकर, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सोनटक्के, प्रशासकीय अधिकारी रविंद्र पूर्णपात्रे, अधीक्षक शर्मिष्ठा कुलकर्णी, वार्षिकोत्सव प्रमुख रघुनाथ पाटील होते.   यावेळी प्रमुख अतिथीं च्या हस्ते विज्ञान - चित्रकला , ग्रंथ, उपक्रम तसेच गणितीय खेळणी व रांगोळीतून गणिताच्या विविध गोष्टी चे रेखांकित केलेल्या प्रदर्शनी चे उदघाटन करण्यात आले.         विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श...

जनकल्याण निवासी विद्यालयात वार्षिकोत्सवाचे आयोजन

हरंगुळ(बु) येथील जनकल्याण निवासी विद्यालयाचा २६वा वार्षिकोत्सव येत्या ७,८व ९ फेब्रुवारी २०२० रोजी संपन्न होणार आहे. वार्षिकोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात चित्रकैला, विज्ञान, ग्रंथ तसेच विद्यार्थ्यांनी तयार केलेले विविध उपक्रम, व सेवा प्रकल्पाच्या प्रदर्शनीचे उदघाटन केले जाणार आहे.  ग्रामीण भागात खेळल्या जाणा-या  खेळांचे "खेळ यात्रा" म्हणून आयोजन केले आहे. काव्य संध्या, वक्तृत्व, कथाकथन, वर्गश:पद्य पाठांतर, कलाविष्कार कार्यक्रम अशा विविध  लक्षवेधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे     ७ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ९.००वा. वार्षिकोत्सवाचे उद्घाटन मा. श्री. भांजीभाई पटेल(सरस्वती सॉ मिलचे संचालक) यांच्या हस्ते होणार आहे. तर विद्यार्थ्यांना मा. श्री. सुरेशजी पाटील (कार्यवाह,संवेदना प्रकल्प,लातूर)मार्गदर्शन करणार आहेत. तसेच विज्ञान मंडळ व चित्रकला मंडळाच्या वतीने "पर्यावरण जागृती " म्हणून चित्र प्रदर्शनी, ग्रंथ, विद्यार्थ्यांनी तयार केलेले विविध साहित्य निर्माण केलेले प्रदर्शनी उद्घाटन होणार आहे.  दुपारी ३:०० वाजता ग्रामीण भागात पूर्वी खेळल्या जाणाऱ्या  विवि...

अखंड भारताच्या प्रेरणेचा झरा - शिवतीर्थ रायगड

इमेज
शि-वा-जी या तीन अक्षरातून अदम्य प्रेरणा साठवून ठेवता येते. राष्ट्राच्या संक्रमणावस्थेत, पराधीन कालखंडात या नावानेच आम्हाला परकिय आक्रमकांशी झुंजत स्वाधीनता मिळवण्यासाठी प्रेरणा दिली. शिवचरित्राची प्रेरणा केवळ महायुद्धात व राजकारणात उपयोगी पडेल असे नव्हे तर जीवनातील प्रत्येक क्षेत्रात ती मोलाची आहे, म्हणून जनकल्याण निवासी विद्यालय प्रतीवर्षी वर्ग ९वी ची सहल रायगडावर नियोजित असते. याला सहल न म्हणता 'मातृभूमि दर्शन' असा शब्द वापरला जातो. गत २० वर्षापासून २५ व २६ जानेवारी ला किल्ल्यावर मुक्कामी राहून प्रजासत्ताक दिन रायगडावर साजरा करण्याचे भाग्य मिळते.   दुर्ग रायगडावर जाण्यापुर्वी गडाची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी आणि केवळ मौजमजा नाही तर इतिहासाविषयी जिज्ञासा व प्रेरणा निर्माण व्हावी यासाठी काही पुर्व योजना केल्या जातात. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी साहित्य वाचन, किल्यावर असलेल्या वास्तूची बारिक सारिक माहिती मिळवणे. किल्ल्याविषयी माहिती पट दाखविले जाते. विविध लेखकांनी रायगडावर लिहिलेली माहिती अभ्यासून किल्ल्यावर जाण्यासाठी तयार होतात.    दि. २४ जा...