पोस्ट्स

मे, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

खो-खो च्या राष्ट्रीय ऑनलाईन प्रशिक्षणासाठी लातूरच्या १० क्रीडा मार्गदर्शकांचा सहभाग

इमेज
- महाराष्ट्र खो-खो असोसिएशन व छत्रपती शिवाजी महाविद्यालय, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले होते. या ऑनलाईन खो-खो प्रशिक्षण दिले. ५ मे ते १३ मे या कालावधीत संपन्न झाले. भारतभरातील १०२० खो-खो मार्गदर्शकांनी सहभाग नोंदवला. या प्रशिक्षणासाठी लातूर जिल्ह्यातील १० मार्गदर्शकांचा सहभाग होता. यामध्ये नामदेव गोमारे, चंद्रकांत लोदगेकर, दत्ता माने, निशिकांत सदाफुले,गणेश निकम, सौ. रत्नराणी कोळी, सौ. योगिता संदीकर, सौ.सुवर्णा डोईजोडे ,महेश सुर्यवंशी, नरेंद्र वंगाटे यांचा सहभाग होता.  या प्रशिक्षणात खो-खो खेळाचा इतिहास, आक्रमणाचे कौशल्य, संरक्षणाचे कौशल्य, मैदानाचे मोजमाप,खेळाडूंचे मानसशास्त्र, व्यायाम, आहार तसेच खेळाडूंना होणारी दुखापत या विषयावर अॅड. अरूण देशमुख, डॉ. अमित प्रभू, डॉ. नरेंद्र कुंदर,प्रविण चालक, संजय मुंढे, प्रशांत इनामदार, बिपिन पाटिल, डॉ. अमित राव्हते,डॉ.ज्योती सोळुंके,डॉ.चंद्रजित जाधव, गोविंद शर्मा,डॉ.प्रदिप देशमुख या दिग्गजांनी झुम मीटिंग व्दारे नऊ दिवस मार्गदर्शन केले.