पोस्ट्स

ऑक्टोबर, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सामाजिक भान देणारी शाळा

  रविवार, २५ मार्च २०१२ जनकल्याण निवासी विद्यालय, हरंगुळ बुद्रुक, लातूर लातूर-किल्लारी परिसरात ३० सप्टेंबर, १९९३ रोजी झालेल्या भूकंपानंतर ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’च्या जनकल्याण समितीने ‘जनकल्याण निवासी विद्यालया’ची स्थापना केली. लातूरजवळील हरंगुळ येथील साडेनऊ एकर जमिनीवर वसलेला हा प्रयोग म्हणजे ‘चलो जलाएँ दीप वहाँ, जहाँ अभीभी अंधेरा है’ या पंक्तींप्रमाणे ग्रामीण, शेतकरी, निम्नमध्यमवर्गीय, उपेक्षित समाजघटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी देणारा शैक्षणिक प्रकल्प आहे. या शाळेत साधारण गुणवत्तेच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. शिक्षक-पर्यवेक्षकांच्या सहकार्याने तो उत्तम गुणवत्ता प्राप्त करतो असा अनुभव आहे. आपल्याकडे शाळांमधून साचेबद्ध शिक्षण दिले जाते. या पाश्र्वभूमीवर जनकल्याण निवासी विद्यालयाची शाळा अनोखी शाळा ठरते. क्रमिक शैक्षिणक विकासासह चारित्र्य, सुसंस्कार, सदाचार, साहस, राष्ट्रभक्ती आदी गुणांचा विकास मुलांमध्ये व्हावा असा प्रयत्न केला जातो. त्यासाठी पहाटे पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत सुव्यवस्थित दिनचर्या रचण्यात आली आहे. विनोबा भावे म्हणत ‘प्रत्येक शाळेत घर घुसावे ...

जनकल्याणच्या प्रदीप मुसांडे व हनुमंत पांचाळ यांना ' राष्ट्रशिल्पकार पुरस्कार ' प्रदान

इमेज
हरंगुळ (बु) :         लातूर येथील रोटरी क्लबच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त कोजागिरी पौर्णिमेला शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी जनकल्याण निवासी विद्यालयाचे प्रदीप मुसांडे व हनुमंत पांचाळ या दोघांचा लातूर रोटरी क्लबचे अध्यक्ष श्रीरामजी देशपांडे, हरिषजी मोटवाणी, हरिप्रसाद सोमाणी,डॉ.विनोद लड्डा यांच्या हस्ते ' राष्ट्रशिल्पकार पुरस्कार ' देवून सन्मान करण्यात आला. प्रदीप मुसांडे यांनी  हिंदी भाषेवरील विद्यार्थ्यासाठी केलेले विविध प्रयोग,सुत्रसंचालन, निवेदन अनेक कार्यक्रमात प्रभावीपणे केलेले आहे.  तसेच क्रीडा क्षेत्रात कबड्डीचे प्रशिक्षक व राज्य पंच म्हणून त्यांनी भरीव कामगिरी केली आहे . तर हनुमंत पांचाळ यांनी संगीत क्षेत्रात अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयच्या वतीने घेतल्या जाणा-या विविध परिक्षेसाठी प्रशिक्षण देवून १२०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षीत केले आहे . या योगदानाबद्दल हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे .  पुरस्कार मिळाल्यामुळे विद्यालयाच्या वतीने प्रकल्प अध्यक्ष प्रकाशराव रायचुरकर, कार्यवाह मधुक...

जनकल्याण निवासी विद्यालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा

इमेज
हरंगुळ (बु) :          जनकल्याण निवासी विद्यालयात वाचन प्रेरणा दिवस उत्साहात संपन्न करण्यात आला. विद्यार्थ्यामध्ये वाचनाची आवड व प्रेरणा निर्माण व्हावी म्हणून विद्यालयात मागील अनेक वर्षांपासून अवांतर वाचनासाठी विशेष प्रयत्न केले जातात. तसेच माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्मृतीतून प्रेरणा मिळावी. म्हणून वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात येतो.         या प्रसंगी मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सोनटक्के सर, हरिदास बाबळसुरे सर उपस्थित होते.  विद्यार्थी वर्षभर अवांतर पुस्तकांचे वाचन करतात. सर्वाधिक पुस्तकांचे वाचन करणा-या विद्यार्थ्यांचा पुस्तक देवून उत्तम वाचक म्हणून कौतुक करण्यात येते. यावर्षीच्या उत्तम वाचकांमध्ये ऋतुराज दारफळकर, श्रध्दा कळवंडे, स्नेहा थोरात, सुरज लवटे, श्रीगिता यादव, वैष्णवी शेळके, प्रियशा शिंदे, महेश कवडे, सायली शिंदे, वेदांत टेकाळे,स्नेहा फुलसे,तसेच शिक्षक- कर्मचारी वर्गातून चेतनाताई देशपांडे यांचा सन्मान करण्यात आला.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल दिनेश देशमुख यांनी केले.

जनकल्याण चा शिक्षक-पर्यवेक्षकांसाठी अभ्यास वर्ग एक अग्रगण्य योजना

इमेज
हरंगुळ (बु)लातूर येथील जनकल्याण निवासी विद्यालयातील कर्मचारी-कार्यकर्त्यासाठी मागील २० वर्षापासून प्रतीवर्षी निवासी अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात येते. याही वर्षी १९व २० ऑक्टोबर २०१९ रोजी अभ्यास वर्ग आयोजन केले आहे. या अभ्यास वर्गाचे उद्घाटन  रा. स्वं.संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांताचे संघटनमंत्री शरद भाऊ खाडिलकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रांत उपाध्यक्ष रमेशराव जोशी, शिक्षण आयामाचे प्रमुख वसंतराव फाटक, प्रांत सहकार्यवाह विनायकराव डंबीर हे उपस्थित राहणार आहेत.  प्रकल्पात ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेतात. शिक्षण-समाज प्रबोधन-संस्कार या त्रिसूत्रीवर आधारित विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कार्यक्रम उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. या विकास कार्यात प्रकल्पात काम करणाऱ्या शिक्षक-पर्यवेक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. कोणत्याही शैक्षणिक प्रकल्पात तेथील विद्यार्थ्यांचा विकास हा त्या प्रकल्पातील कार्यरत कर्मचाऱ्यांच्या विकास पातळीवर अवलंबून असतो, याचा विचार करून येथील विद्यार्थी विकासात सहभागी शिक्षक-पर्यवेक्षकांना योग्य प्रश...

जनकल्याण चा अभय शिरसाट राज्य स्पर्धेसाठी निवड

इमेज
हरंगुळ (बु) क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय शालेय बुध्दिबळ स्पर्धा दि. ५ ऑक्टोबर २०१९ रोजी नांदेड येथे संपन्न झाल्या.    या स्पर्धेत जनकल्याण निवासी विद्यालयातील १७ वयोगटातील चि.अभय गंगाधर सिरसाट खेळाडूने विभागीय स्पर्धेत व्दितीय प्राविण्य मिळवले. १६,१७व १८आॕक्टोबरला खोपोली जि.रायगड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. या स्पर्धेत लातूर विभागाचे नेतृत्व करणार आहे.   या विजयी खेळाडूस विनोद काळे यांनी मार्गदर्शन केले. सर्व विजयी खेळाडू व मार्गदर्शकाचे विद्यालयाच्या वतीने अभिनंदन प्रकल्प अध्यक्ष प्रकाशराव रायचुरकर, कार्यवाह मधुकरराव कुलकर्णी, शालेय समिती अध्यक्ष उमेशजी सेलूकर, वसतिगृह समिती अध्यक्ष राजेशजी सुगरे, प्रशासकीय अधिकारी रविंद्र पुर्णपात्रे, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सोनटक्के, अधीक्षक शर्मिष्ठा कुलकर्णी, शिक्षक, पर्यवेक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी यांनी केले.

जनकल्याण चे विभागीय योगासन स्पर्धेत यश

इमेज
जनकल्याण चे  विभागीय योगासन स्पर्धेत यश क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे  व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय शालेय योगासन स्पर्धा दि. ३ ऑक्टोबर २०१९ रोजी जनता विद्यालय, येडशी येथे संपन्न झाल्या.   या स्पर्धेत जनकल्याण निवासी विद्यालयातील  ५ खेळाडूनी प्राविण्य मिळवले. राज्यस्तरीय स्पर्धेत लातूर विभागाचे नेतृत्व करणार आहेत.  यामध्ये १४ वयोगटात मुले :- वैभव राऊत तर १७ वयोगट मुले विष्णू मुंगळे,सुशांत माळेगावकर,अमोल चव्हाण तर मुली गौरवी भोसले  यांची राज्यस्तरीय योगासन  स्पर्धेसाठी निवड झाली. या विजयी खेळाडूस चन्नया स्वामी यांनी मार्गदर्शन केले. सर्व विजयी खेळाडू व मार्गदर्शकाचे विद्यालयाच्या वतीने अभिनंदन प्रकल्प अध्यक्ष प्रकाशराव रायचुरकर, कार्यवाह मधुकरराव कुलकर्णी, शालेय समिती अध्यक्ष उमेशजी सेलूकर, वसतिगृह समिती अध्यक्ष राजेशजी सुगरे, प्रशासकीय अधिकारी रविंद्र पुर्णपात्रे, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सोनटक्के, अधीक्षक शर्मिष्ठा कुलकर्णी, शिक्षक, पर्यवेक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी य...