पोस्ट्स

जुलै, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

*जनकल्याण निवासी विद्यालयाचा शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचा १०० टक्के निकाल*

इमेज
(संग्रहातील फोटो)  लातूर ता. २९ जुलै (जनकल्याण वृत्तसेवा) :  हरंगुळ(बु) येथील जनकल्याण निवासी विद्यालयाचा शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचा १००टक्के निकालाची परंपरा कायम आहे. विद्यालयातील २२ विद्यार्थ्यांना ९० टक्यांपेक्षा अधिक गुण घेतले. तर५७ विद्यार्थ्यांनी ९० ते ८० टक्के मध्ये गुण संपादन केले आहेत. या परीक्षेसाठी८५ विद्यार्थी बसले होते. यातील विशेष प्राविण्यासह सर्व ८५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यालयातून चि. अक्षय श्रीधर वरेकर याने ९७ टक्के गुण घेत प्रथम, निवृत्ती बालाजी आलगुले याने ९६.६०टक्के गुण घेत व्दितीय, तर विद्यालयातून तृतीय व मुलीमधून प्रथम साक्षी संतोष कुटे हिने ९५.६० टक्के गुण घेत पटकाविला. या विद्यार्थ्यांचे तसेच दहावी प्रमुख सौ. माधुरीताई अंतरकर, सौ. दाक्षायणी भालेकर, पर्यवेक्षक बाबासाहेब मते, गुणवंत राठोड, विद्या कुलकर्णी यांचे प्रकल्प अध्यक्ष प्रकाशराव रायचुरकर, प्रकल्प कार्यवाह मधुकरराव कुलकर्णी, शालेय समिती अध्यक्ष उमेश सेलूकर, वसतीगृह समिती अध्यक्ष राजेश सुगरे,मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सोनटक्के, प्रशासकीय अधिकारी रवींद्र पुर्णपात्रे,अधीक्षक शर्म...

नाणेसंग्रहाचा अनोखा छंद

इमेज
 मला शालेय जीवनापासूनच नाणे जमा करण्याचा छंद आहे.  आता माझ्याकडे मोघल काळापासून आतापर्यंत चे विविध प्रकारचे ३५०पेक्षा अधिक नाणे आहेत. नाणे संग्रहात जर्मन, तांबे, लोह, चांदी, पितळ, स्टील अशा वेगवेगळ्या धातूंची नाणी आहेत.  यामध्ये मोघल, बहमनी, इंग्रज कालीन ते आताचे प्रचलित नाण्यासोबत विदेशी अमेरिकन, इंग्लंड, दुबई, नेपाळ, झांबिया देशातील काही नाणे आहेत.  यांच्याकडे  असलेल्या नाण्यामध्ये  विजयनगर साम्राज्यातील चलन, बहमनी, मोगल, निजाम, कालावधीतील नाणे तसेच इग्रंज कालावधीतील १८६२,१९०८ चे व्हिक्टोरिया राणी, १९३५, १९४३चे एबी वर्ल्ड क्लास जॉर्ज सहावा किंग सम्राट वन क्वार्टर अण्णा इंडिया ,१९०७ च्या १रूपयावर एडवर्ड सातवा किंग ,१९२५ च्या १/४ रुपयावर जॉर्ज हि किंग सम्राट बॉम्बे मिंट यांचे चेहरा चिन्हांकित केलेले नाणे तसेच १,२, अण्णा ही आहेत. या संकलनात  स्वतंत्र भारतातील   प्रचलित नाणे १,२ , ३, ५ , १०,२०,२५,५०पैसावर विविध संदेश आहेत. यामध्ये १,२,५,१० रुपयावर भारतीय राजकारणी, संत, राजे, संत, महापुरुष यांच्या जन्म शताब्दी, ७५,१२५,१५०...