जीवन जगण्याची कला शिका.- सहसरकार्यवाह डॉ. मनमोहनजी वैद्य
हरंगुळ (बु) येथील जनकल्याण निवासी विद्यालयात स्व.बाळासाहेब देवरस भवन या अत्याधुनिक सभागृह, ब्रह्मार्पण भोजन कक्ष, नांलदा अध्ययन अनुसंधान केंद्र व संस्था प्रशासकीय कार्यालय इ.समावेश असलेल्या वास्तूचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह डॉ. मा.श्री मनमोहनजी वैद्य, लातूरचे खासदार मा. श्री सुधाकरजी श्रृंगारे, रा.स्व.संघ, जनकल्याण समितीचे प्रांताध्यक्ष डॉ. रविंद्रजी साताळकर, प्रकल्प अध्यक्ष प्रकाशजी लातूरे,संघचालक संजयजी अग्रवाल उपस्थित होते. डॉ.मनमोहनजी यांनी मार्गदर्शन करताना लातूर पॅटर्न हा कोट्यानंतर प्रसिद्ध पॅटर्न आहे. स्पर्धेच्या युगा त जनकल्याण चे विद्यार्थी गतिमानतेने काम करतात. मात्र ,या पळण्यातून दमछाक होते. जीवन कशाकरता हा विचार आवश्यक. डॉक्टर इंजिनीयर बनण्याचे स्वप्न असू शकते ते जीवन जगण्यासाठीचे साधन आहे.ते ध्येय नाही. आपले ध्येय जीवनाची सार्थकता करण्याचे हवे. समाज परिवर्तनासाठी सर्वांनी आपले योगदान दिले पाहिजे. यात सर्व प्रकारचे लोक आपले योगदान देऊ शकतात. समाजाची हीच खरी गरज आहे. समाजचक्र गतिमान राहण...