हैद्राबाद मुक्तिसंग्राम एक ज्वलंत इतिहास भाग -२
हैद्राबाद मुक्तिसंग्रामात अनेक ज्ञात अज्ञात क्रांतिकारकांच्या त्यागाने रक्ताने लिहिला गेला आहे. आबालवृद्ध महिला, तरूण, या सर्वांनी स्वांतत्र्याच्या या अग्निकुंडात स्वत:ला झोकून दिले होते. आपली भारतमाता निजाम राजवटीच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी जो तो स्वत:चे प्राण अर्पण करायला समोर येत होता. हा सा-या निझाम राजवटीत क्रांती चा वणवा पसरला होता. निजामशाही तील प्रत्येक जन देशासाठी काहीही करायला सिध्द झाला होता. हैद्राबाद संस्थानातील अनेक खेड्या पर्यंत या क्रांतीचे लोण पसरले होते. नाईचाकूर येथे स्वातंत्र्याच्या विचारणे भारावलेली माणसं होती. नेहमी स्वातंत्र्याची खलबत व्हायची. यासाठी वातावरण पोषक करण्यासाठी आर्य समाजाचे प्रमुख शामलालजी, सदाविजय आर्य यांच्या धाडसी कृत्यांमुळे भारावून गेलेले युवक या स्वातंत्र्य संग्रामात हिरीरीने सहभागी होऊ लागले. यामध्ये राम बापू पवार, माणिक कारभारी, बळीराम कारभारी आदी जेष्ठ मंडळीचा सहभाग होता. याच वेळी गोविंदराव पवार, शाहूराज जाधव हे क्रांतीसिह नाना पाटील यांच्या सहवासात राहून आले होते. गावातील ५०-६० युवकांला स्वातंत्र्य सं...