नाणेसंग्रहाचा अनोखा छंद
मला शालेय जीवनापासूनच नाणे जमा करण्याचा छंद आहे. आता माझ्याकडे मोघल काळापासून आतापर्यंत चे विविध प्रकारचे ३५०पेक्षा अधिक नाणे आहेत. नाणे संग्रहात जर्मन, तांबे, लोह, चांदी, पितळ, स्टील अशा वेगवेगळ्या धातूंची नाणी आहेत.
यामध्ये मोघल, बहमनी, इंग्रज कालीन ते आताचे प्रचलित नाण्यासोबत विदेशी अमेरिकन, इंग्लंड, दुबई, नेपाळ, झांबिया देशातील काही नाणे आहेत.
यांच्याकडे असलेल्या नाण्यामध्ये
विजयनगर साम्राज्यातील चलन, बहमनी, मोगल, निजाम, कालावधीतील नाणे तसेच इग्रंज कालावधीतील १८६२,१९०८ चे व्हिक्टोरिया राणी, १९३५, १९४३चे एबी वर्ल्ड क्लास जॉर्ज सहावा किंग सम्राट वन क्वार्टर अण्णा इंडिया ,१९०७ च्या १रूपयावर एडवर्ड सातवा किंग ,१९२५ च्या १/४ रुपयावर जॉर्ज हि किंग सम्राट बॉम्बे मिंट यांचे चेहरा चिन्हांकित केलेले नाणे तसेच १,२, अण्णा ही आहेत. या संकलनात स्वतंत्र भारतातील प्रचलित नाणे १,२ , ३, ५ , १०,२०,२५,५०पैसावर विविध संदेश आहेत. यामध्ये १,२,५,१० रुपयावर भारतीय राजकारणी, संत, राजे, संत, महापुरुष यांच्या जन्म शताब्दी, ७५,१२५,१५० वे जन्मवर्षे या निर्माण केलेले नाणे यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज,सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, श्री अरविंद -संम्पुर्ण जीवन योग है, देशबंधू चितरंनदास, संत तुकाराम महाराज, सुभाषचंद्र बोस,लुई ब्रेन, संत ज्ञानेश्वर, महाराणा प्रताप, लोक नायक जयप्रकाश नारायण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर,राजीव गांधी,आचार्य तुलसीदास , सी सुब्रमण्यम , रविंद्रनाथ टागोर, महात्मा बसवेश्वर, दादाभाई नौरोजी, आचार्य चाणक्य, स्वामी विवेकानंद, पंडित जवाहरलाल नेहरू, बेगम अख्तर , लालबहादूर शास्त्री, संत तिरुवल्लुवर, जमशेदजी टाटा, संत अलफोन्सा, डॉ.राजेंद्र प्रसाद, मदनमोहन मालवीय, जगदगुरु श्री नारायण गुरूदेव, इंदिरा गांधी, कु.कामराज, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, भगवान महावीर २६००वी जन्म कल्याणक, मोतीलाल नेहरू, शहिद भगतसिंह, वीर दुर्गादास, स्वामी चिन्मयानंद, डॉ. होमी भामा यांचे भारतीय चलनावर चेहरा चिन्हांकित करून सन्मानित करण्यात आले.
भारत सरकारने विविध संस्थेच्या किंवा विशेष दिनाचे औचित्यपूर्ण नाणे प्रकाशित केले आहेत यामध्ये राष्ट्रीय अभिलेखागार चे १२५वे वर्षे, महात्मा गांधी हे दक्षिण आफ्रिकेवरून भारतात आले त्यांच्या शताब्दी स्मरणोत्सव म्हणून १० रुपयाचे नाणे काढले, श्री माता वैष्णोदेवी, अंतर राष्ट्रीय परिवार वर्षे, भारतीय रिझर्व बँक, खाद्य एवं पोषकता, पर्यावरण, छोटे किसान, वर्षा सिंचित खेती,जलजीवन का आधार, जैविक विविधता, छोटा परिवार खुशियॉ अपार,८९वे अंतर संसदीय संघ सम्मेलन, राष्ट्रीय एकता, नवम एशियार्ड खेल दिल्ली, भारत का उच्चतम न्यायालय, भारतीय रेल्वे १५० गौरवपूर्ण वर्ष , म्हैसूर विश्वविद्यालय शताब्दी समारोह, दांडी यात्रा,प्रथम स्वतंत्रता संग्राम १५०वर्षे, भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद शताब्दी, कुका आंदोलन १५० वर्षे असे यांचा समावेश मानेच्या संग्रहात आहेत. यासोबत गडकिल्ले, ऐतिहासिक गोष्टीमध्ये विशेष रूची आवड आहे. याचा उपयोग विद्यार्थीसाठी शैक्षणिक साधन म्हणून करतो.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा