शुद्ध भाषेमुळे आपले व्यक्तिमत्त्व फुलते - डॉ. सूर्यनारायण रणसुभे
हरंगुळ येथील जनकल्याण निवासी विद्यालयात 'लेखक आपल्या भेटीला' या उपक्रमा अंतर्गत हिंदी भाषेतील प्रसिद्ध साहित्यिक डॉ. सूर्यनारायण रणसुभे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शुद्ध भाषेतून व्यक्तीमत्व घडते. जिज्ञासा निर्माण होते. यातून मानवाची प्रगती होते असे बोलत होते.
यावेळी प्रकल्प अध्यक्ष प्रकाशजी रायचूरकर, कार्यवाह मधुकर कुलकर्णी, प्रशासकीय अधिकारी रवींद्र पुर्णपात्रे, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सोनटक्के, अधीक्षका शर्मिष्ठा कुलकर्णी उपस्थित होते.
डॉ. सूर्यनारायण रणसुभे यांचा इ. ७वी च्या हिंदी पुस्तकात 'शब्द संपदा' हा पाठ अभ्यासक्रमात आहे. लेखक भेटीस आल्याने विद्यार्थ्यामध्ये आनंदी व उत्साही होते. यावेळी ७वी वर्गातील विद्यार्थ्यांनी १.आपके जीवन का सबसे कठिन प्रसंग कौन - सा रहा है ।
२.क्या आपने बचपन से ही लेखक बनने का सपना देखा था ।
३.आपको लेखक बनने की प्रेरणा कैसे मिली
४.अधिक से अधिक विद्या अर्जित करने के लिए हमें कौन - कौनसे प्रयत्न करने चाहिए ।
५.शब्दों के संसार को आपने विचित्र क्यों कहा है ।
प्रश्न विचारले. यामध्ये स्नेहा थोरात, वैष्णवी काळे,अभय दुधाळ, रेणूका इंगळे, शाश्वत देशमुख,साहिल बिराजदार,ऋतुराज दारफळकर, अक्षरा तापडे यांच्या प्रश्नाला उत्तरे देत असताना डॉ. रणसुभे यांनी विद्यार्थ्यांना लिपीचा शोध आपल्या पूर्वजांनी १ किंवा २ हजार वर्षाच्या प्रयत्न नंतर भाषेचा विकास झालेला आहे. तसेच भाषा ही भौगोलिक भागानुसार बदल व प्रभाव दिसून येतो. या सोबत कोणताही शोध लावताना प्रयत्न, बुध्दी, संयोग यांची आवश्यकता असते. हा समाजातून किंवा वैयक्तिकरित्या लावला जातो.भाषा शुध्द बोलली पाहिजे तसेच शुद्ध लिहिली पाहिजे यातून आपल्या व्यक्तीमत्वाचे दर्शन घडते. असे विद्यार्थ्यांशी संवाद साधताना व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदिप मुसांडे , परिचय रघुनाथ पाटील तर कार्यक्रमाचे आभार मन्मथ खिचडे यांनी व्यक्त केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा