जीवन जगण्याची कला शिका.- सहसरकार्यवाह डॉ. मनमोहनजी वैद्य
हरंगुळ (बु) येथील जनकल्याण निवासी विद्यालयात स्व.बाळासाहेब देवरस भवन या अत्याधुनिक सभागृह, ब्रह्मार्पण भोजन कक्ष, नांलदा अध्ययन अनुसंधान केंद्र व संस्था प्रशासकीय कार्यालय इ.समावेश असलेल्या वास्तूचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह डॉ. मा.श्री मनमोहनजी वैद्य, लातूरचे खासदार मा. श्री सुधाकरजी श्रृंगारे, रा.स्व.संघ, जनकल्याण समितीचे प्रांताध्यक्ष डॉ. रविंद्रजी साताळकर, प्रकल्प अध्यक्ष प्रकाशजी लातूरे,संघचालक संजयजी अग्रवाल उपस्थित होते.
डॉ.मनमोहनजी यांनी मार्गदर्शन करताना लातूर पॅटर्न हा कोट्यानंतर प्रसिद्ध पॅटर्न आहे. स्पर्धेच्या युगा त जनकल्याण चे विद्यार्थी गतिमानतेने काम करतात. मात्र ,या पळण्यातून दमछाक होते. जीवन कशाकरता हा विचार आवश्यक. डॉक्टर इंजिनीयर बनण्याचे स्वप्न असू शकते ते जीवन जगण्यासाठीचे साधन आहे.ते ध्येय नाही. आपले ध्येय जीवनाची सार्थकता करण्याचे हवे. समाज परिवर्तनासाठी सर्वांनी आपले योगदान दिले पाहिजे. यात सर्व प्रकारचे लोक आपले योगदान देऊ शकतात. समाजाची हीच खरी गरज आहे. समाजचक्र गतिमान राहण्यासाठी प्रत्येकाने आपले योगदान दिले पाहिजे. तर ते चक्र गतिमान राहील. जगण्यापेक्षा जगण्याची सार्थकता महत्वाची आहे.ती प्राप्त करण्यासाठी प्रत्येकाने आपले योगदान देण्याची गरज आहे. यातून जीवन जगण्याची कला शिकायला मिळेल असे मत व्यक्त केले.
तसेच खासदार सुधाकर जी शृंगारे यांनी आपल्या मनोगतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य संकट काळात देशाला संकटातून सुटका करण्यासाठीच असते. तसेच आपत्तीकाळात संघाचे कार्य समाजहितासाठी असते. संघाने सुरू केलेल्या सेवा प्रकल्पातून राष्ट्रभक्त नागरिक निर्माण होतात असे मत व्यक्त केले
यावेळी भवन निर्मिती मध्ये ज्या व्यक्तीनी योगदान दिले यांचा सन्मान करण्यात आला. तसेच विद्यालयातील वाढदिवस असणाऱ्या विद्यार्थ्याला शुभेच्छा तर राज्य स्तरीय खेळासाठी निवड झालेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रकल्पातील सर्व कर्मचारी-कार्यकर्ते, पदाधिकारी, विद्यार्थी तसेच लातूर शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, पालक, ,हरंगुळमधील ग्रामस्थ,माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प अध्यक्ष प्रकाशजी लातूरे, तर सुत्रसंचलन मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सोनटक्के यांनी केले. प्रकल्प कार्यवाह श्री राजेशजी सुगरे यांनी आभार व्यक्त केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा