हैद्राबाद मुक्तिसंग्राम एक ज्वलंत इतिहास भाग -२

हैद्राबाद मुक्तिसंग्रामात अनेक ज्ञात अज्ञात क्रांतिकारकांच्या त्यागाने रक्ताने लिहिला गेला आहे. आबालवृद्ध महिला, तरूण, या सर्वांनी स्वांतत्र्याच्या या अग्निकुंडात स्वत:ला झोकून दिले होते. आपली भारतमाता निजाम राजवटीच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी जो तो स्वत:चे प्राण अर्पण करायला समोर येत होता. हा सा-या निझाम राजवटीत क्रांती चा वणवा पसरला होता. निजामशाही तील प्रत्येक जन देशासाठी काहीही करायला सिध्द झाला होता. हैद्राबाद संस्थानातील अनेक खेड्या पर्यंत या क्रांतीचे लोण पसरले होते.
 नाईचाकूर येथे स्वातंत्र्याच्या विचारणे भारावलेली माणसं होती. नेहमी स्वातंत्र्याची खलबत व्हायची. यासाठी वातावरण पोषक करण्यासाठी आर्य समाजाचे प्रमुख शामलालजी, सदाविजय आर्य यांच्या धाडसी कृत्यांमुळे भारावून गेलेले युवक या स्वातंत्र्य संग्रामात हिरीरीने सहभागी होऊ लागले. यामध्ये राम बापू पवार, माणिक कारभारी, बळीराम कारभारी आदी जेष्ठ मंडळीचा सहभाग होता. 
 याच वेळी गोविंदराव पवार, शाहूराज जाधव हे क्रांतीसिह नाना पाटील यांच्या सहवासात राहून आले होते. गावातील ५०-६० युवकांला स्वातंत्र्य संग्रामात सहभागी होण्यासाठी एकत्र नाभिराज जमालपुरे यांच्या घरी केले. निझाम पोलिसांना न घाबरता आपल (घर)वाडा स्वातंत्र्य सैनिकांना सदैव मोकळा केला. बैठक सुरू झाली. आणि पहिले क्रांतीचे पाऊल उचलण्यासाठी योजना तयार केली गेली.
शिंदी चे लागवड मोठ्या प्रमाणात केली जात होती. शिंदी पासून सरकार मोठा प्रमाणात आर्थिक उत्पादन होत होते. निझाम विरोधी आंदोलनाचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणजे शिंदी चे झाडे तोडून टाकणे. वेळप्रसंगी जाळणे असे कृत्ये करून सरकार ला त्रासदायक घटना सतत केल्या जात होत्या. परंतु याला १९४६ साली हे जनआंदोलन निझाम राजवटीत सर्वत्र चालू झाले होते.     
  संस्थानात शिंदीच्या झाडांपासून मद्य तयार केले जात होते. हे सरकारी उत्पन्नाचे मोठे साधन होते. शेतकऱ्यांच्या खाजगी शेतात असलेली झाडे सुध्दा सरकारचे लोक घेत होते. १९४७ साली हैद्राबाद संस्थानात सर्वत्र जंगल सत्याग्रह करण्यात आले. मोठ्या संख्येने विविध ठिकाणी सत्याग्रह झाले. याच कालावधी साताऱ्याचे क्रांतिसिंह नाना पाटील यांची नाईचाकूर येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. हि सभा नाईचाकूर येथील नाभिराज जमालपुरे यांच्या शेतातील आंबराईत झाली . या सभेनंतर गावातील युवकांना स्वातंत्र्याचे स्फुरण अधिक झाले. पुढिल आंदोलनाची दिशा निश्चित ठरवण्यात आली. काही दिवसात गावातील युवकांनी हे शिंदीचे बन तोडून फेकून दिले. हजारो रूपयाचे उत्पन्न रातोरात नष्ट केले. या सोबत शिंदी जमा करणारी केंद्रे नष्ट केले, दारूच्या भटट्या पाडून टाकण्यात आल्या.पैसा लुटून स्वातंत्र्याच्या कामासाठी वापर केला.
निजाम पोलिस क्रांतिकारकांच्या शोधात होते. हे कृत्य कोणी केले.हे त्याना समजत नव्हते म्हणून गावातील फितुरांना हाताशी घेऊन नावे काढण्यात येत होते. या मध्ये सहभागी असलेले युवक सीमावर्ती भागात असलेल्या वागदरी कॅम्प मध्ये सहभागी होण्यासाठी निघाले. यातील तिघे जण गावातील फितुरी मुळे निझाम पोलिसाच्या हाती लागले. 
यामध्ये राम बापू पवार, गिरजाप्पा काळे, धोंडीबा वडर हे होते. यांना सीमावर्ती भागातील नळदुर्ग येथील जेल मध्ये कैद केले. ५ महिने जेल मध्ये होते. या कालावधीत त्यांनी पोलिसांशी चांगले संबंध निर्माण केले. पोलिसासोबत मैत्रीने राहून विश्वास संपादन केले. 
  जेल मध्ये दिलेले अंथरून- पांघरूणापासून राम पवार यांनी गोपन (पाखरे राखायची) विणून तयार केले. ती सुरक्षित ठिकाणी ठेवले होते. 
दररोज प्रमाणे प्रात:विधीला जेलच्या बाहेर घेऊन जात होते. याचा फायदा घेऊन तयार केलेली गोपन कंबरेला व्यवस्थित गुंडाळून सोबत घेतले. पोलिसांशी गप्पा मारत-मारत जेल पासून जवळच असलेल्या बुरुजाच्या जवळ गेले. पोलिसांनी विश्वासाने पाथ:विधी साठी जाण्यास सांगितले.पोलिस तेथून दूर उभे होते. या संधीचा उपयोग करून राम पवारांनी बुरूजावरून पलायन केले. हातातील तांब्या खाली पडल्यामुळे पोलिस सावध झाले. आणि पोलिसांनी पाठलाग केला. पोलिसांशी गोपनीच्या साहाय्याने पोलिसांशी कडवी झुंज देऊन २ पोलिसाचा खात्मा करून वागदरी कॅम्प मध्ये भूमीगत झाले. काही काळाने पेठसांगवीला नातेवाईकाकडे राहू लागले. 
यासोबत राष्ट्रीय विचारांची शाळा सुरू केले. किसान दल संघटन, वंदेमातरम् आंदोलन, जंगल सत्याग्रह, स्वांतत्र्य लढ्यात महिलांचे योगदान, झेंडा आंदोलन अशा अनेक आंदोलनात नाईचाकूर येथील या व्यंकट जयवंता पवार,माणिक (कारभारी) देवराव पवार. तुळशीराम साळुंके (व्हगाडी) सुग्रीव(दादा) हाणमंत पवार, कॅप्टन नामदेव पवार, 
जयपाल आदप्पा कांक्रबे, सदानंद सनातन, माणिक पवार, शंकर लंकडे, काॅ. हिरा पवार, नामदेव पवार, सोपान माने, महादा सनातन, शाहुराज जाधव, गोविंद पवार, किसन तुकाराम पवार, नागनाथ पवार, नाभीराज जमालपुरे, माणिकराव पवार, बाबुसिंह पवार, शंकर सनातन, तुळशीराम काळे, बाबाराव भोसले, किसन महादेव पवार, व्यंकट भाई माने, किसन तात्याराव पवार, व्यंकट गोपाळ पवार, राम बापु पवार, मनोहरसिंह पवार, माणिक सगर, बाबु पांडुरंग इटुबोने, तुकाराम इटुबोने ,रंगराव कदम ,डिगबंर कुलकर्णी, पांडूरंग बाबळसुरे, तुळशीराम साळुंके आदिने क्रांतीकारकांनी या लढ्यात नेतृत्व करून मोलाचे योगदान दिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अखंड भारताच्या प्रेरणेचा झरा - शिवतीर्थ रायगड

*जनकल्याण निवासी विद्यालयाचा शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचा १०० टक्के निकाल*

शुद्ध भाषेमुळे आपले व्यक्तिमत्त्व फुलते - डॉ. सूर्यनारायण रणसुभे