*हैद्राबाद मुक्तिसंग्राम एक ज्वलंत इतिहास*

                    भाग - १
१५ ऑगस्ट १ ९ ४७ भारतात स्वातंत्र्याची पहाट झाली . पण हैद्राबाद संस्थान अजुनही पारतंत्र्याच्या अंधकारात होते . येथील निजामशाही १७२४ ते १ ९ ४८ पर्यंत म्हणजे जवळपास २२५ वर्षे जनतेचा हुकुमशाही पद्धतीने छळ करीत होती . हैद्राबादचा शेवटचा निजाम होता . मीर उस्मान अली खाँ बहादूर . दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटीश साम्राज्य दुर्बळ झाले होते . देशांतर्गत सैन्याची बंडखोरी , जागतिक वातावरण , क्रांतीकारी चळवळीमुळे इंग्रजांना भारतात आपले राज्य टिकवणे अशक्य वाटू लागले होते . भारताची फाळणी करण्याचे व संस्थानांना स्वातंत्र्य देण्याचे इंग्रजी धोरण पाहुन शेवटचा निजाम उस्मान अलीला दक्षिणेत स्वतंत्र राज्य उभे करण्याची स्वप्ने पडू लागली होती . पण शेवटी भारताचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रयत्नाने हैद्राबाद संस्थान दि . १७ सप्टेंबर १ ९ ४८ ला स्वतंत्र झाले .या लढ्याची कहाणी अतिशय रोमांचकारी आहे .
      हैद्राबाद संस्थानात मराठवाडा , तेलंगणा आणि आंध्रप्रदेशच्या भागांचा समावेश होता . येथे हिंदु समाज ८५ टक्के , मुस्लिम १२ टक्के आणि इतर समाज ३ टक्के होता . निजामशाहीत खाकसार रझाकार या संघटनांनी हिंदूंना जगणे मुश्किल केले होते . हिंदुना मुसलमान करण्याची मोहीमही या काळात सुरू करण्यात आली होती . राज्यकारभाराची भाषा उर्दू करण्यात आली होती . त्यामुळे तेलुगु , कन्नड , मराठी या भाषांचा विकास थांबला होता . हिंदुना सार्वजनिक सण - उत्सव करण्याला परवानगी नव्हती . मशिदीसमोर हाच वादय वाजवायची नाहीत असा नियम होता . निजामाने जनतेवर अत्याचार करण्यासाठी इत्तेहादुल मुसलमीन ' या संघटनेचा वापर केला . या संघटनेची स्थापना १ ९ २८ मध्ये हैद्राबाद ( भाग्यनगर ) येथे झाली . ही संघटना मुस्लिम लिगपेक्षाही विषारी आणि जहाल होती . लातूरच्या कासीम रझवी याचा या संघटनेच्या संपर्कात आला . कासीम रझवी मुळ उत्तरप्रदेशातील अलिगढचा होता . अलिगढ मुस्लिम विद्यापीठात त्याने कायदयाची पदवी घेतली होती . लातूर येथे तो वकीली व्यवसाय करीत असे . इतेहादुल मुसलमीनचे नेतृत्व त्याच्याकडे आल्यानंतर त्याने इस्लामच्या आक्रमण आणि अत्याचाराची परंपरा पुढे चालवली . कासीम रझवी इत्तेहालचा प्रमुख झाल्यानंतर त्याने रझाकार संघटना उभी केली . त्यांना सैनिकी प्रशिक्षण देऊन दारुगोळा पुरवून हिंदूवर अत्याचार करायला सुरूवात केली . मुलींना पळवणे , त्यांच्यावर बलात्कार करणे , हत्या करणे हे रझाकारांचे रोजचे कार्य होते 
    रझाकारांच्या अत्याचारांमुळे हिंदुची दयनीय अवस्था झाली होती . हैद्राबादेतील ' इमरोज ' नावाच्या उर्दू दैनिकाचे संपादक शोएबउल्लाखान हे आपल्या लेखनातून रझवी आणि निजामावर टिका करीत असे . हे रझवीला सहन झाले नाही . त्याने एका भाषणात सांगितले की , ऐसा लिखने वाले के हात कलम कर देने चाहिए ' आणि खरोखर शोएबउल्लाखान यांचे हात तोडण्यात आले . व नंतर त्यांचा खून करण्यात आला . उन्मत्त रझाकारांच्या अत्याचाराने जनता भरडून निघत होती . त्यामुळे जनतेने जुलमी निजाम राजवटीविरुद्ध संघर्ष पुकारला . यात हैद्राबाद स्टेट काँग्रेस , 
आर्यसमाज , हिंदु महासभा आदीचा सहभाग होता १ ९ ३८ मध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैद्राबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली होती . आर्यसमाजानेही या लढ्यात मोलाचे योगदान दिले . 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अखंड भारताच्या प्रेरणेचा झरा - शिवतीर्थ रायगड

*जनकल्याण निवासी विद्यालयाचा शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचा १०० टक्के निकाल*

शुद्ध भाषेमुळे आपले व्यक्तिमत्त्व फुलते - डॉ. सूर्यनारायण रणसुभे