जनकल्याण निवासी विद्यालय आट्यापाट्या स्पर्धेत विजयी

जनकल्याण निवासी विद्यालय आट्यापाट्या स्पर्धेत विजयी

हरंगुळ बु येथील जनकल्याण निवासी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय आट्यापाट्या स्पर्धेत यश मिळवून विभागीय स्पर्धेत सहभाग मिळविले.
  दि. २८ सप्टेंबर रोजी अहमदपूर येथील अहिल्याबाई होळकर विद्यालयाच्या मैदानावर झालेल्या स्पर्धेत १४ ,१७ वयोगट मुले ,मुली संघाने उत्तम खेळ करत विजयी ठरले.
विद्यालयातील खेळाडू  विविध वयोगटात विजयी झाले. यामध्ये १४ वयोगटातील मुली विजयी होत विभागीय स्पर्धेत लातूर जिल्हाचे नेतृत्व करणार आहेत. या संघात गौरी गुंड, महेश्वरी गव्हाणे, वैभवी जाधव, आरती काळे, प्रियशा शिंदे, गायत्री शेळके, महादेवी ढोबळे, श्वेता विश्वेकर, वैष्णवी शेळके, विधी तम्मेवार, आकांक्षा निपाणीकर,अमृता राऊत
१४ ,१७ वयोगट मुलांचा संघ उपविजेता ठरला यामध्ये विराज मोकाशे,मनोज कदम, वैभव थोरबोले,दत्ता कोडे, कार्तिक उजळंबे,सुजीत होनमाळे, प्रसाद सावंत, धिरज बिराजदार, सुमित सुर्यवंशी, जनक कराड, दिग्विजय निगुट,कृष्णा दिवाणे तर १७ वयोगटात आशिष नागुलकर, अक्षय वरेकर, गणेश भोसले, मयुर सुरोसे,पृथ्वीराज कदम, समाधान शिंदे, मधुकर मोटे, संकेत माळेगावकर, ओम खोसे, अभय सिरसाट, उमेश काळे, विजय हिंगे तर १७वयोगट मुली तृतीय क्रमांक आला. यामध्ये पायल विधाते,निकिता कवडे, श्रावणी गायकवाड, पुजा पेठे, किर्ती लोखंडे, शितल मुळे, सायली शिंदे, मुक्ता कुंभार, प्राची पौळ,सिध्देश्वरी बिरले,कोमल फुंदे, साक्षी जाधव हे या संघामध्ये होते.
 या विजयी संघास ला मार्गदर्शन  दत्ता माने यांनी केले.
विजयी खेळाडू चे अभिनंदन प्रकल्प अध्यक्ष प्रकाशराव रायचुरकर, कार्यवाह मधुकरराव कुलकर्णी, शालेय समिती अध्यक्ष उमेशजी सेलूकर, वसतिगृह समिती अध्यक्ष राजेशजी सुगरे, प्रशासकीय अधिकारी रविंद्र पुर्णपात्रे, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सोनटक्के, अधीक्षक शर्मिष्ठा कुलकर्णी यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अखंड भारताच्या प्रेरणेचा झरा - शिवतीर्थ रायगड

*जनकल्याण निवासी विद्यालयाचा शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचा १०० टक्के निकाल*

शुद्ध भाषेमुळे आपले व्यक्तिमत्त्व फुलते - डॉ. सूर्यनारायण रणसुभे