रक्तदान
लोकसेवा मंडळ, लातूर यांच्या वतीने गेल्या 10 वर्षापासून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते। या वर्षी कलम 370 रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयीन तरुण तरुणीचा प्रचंड उत्साह पाहण्यात आला.या शिबिरामध्ये तब्बल 301 रक्तदात्यांनी रक्तदान करून या सामाजिक कार्यात आपला हातभार लावला.
तत्पूर्वी या शिबिराची सुरुवात बुध्दवंदनाने झाली
या शिबिरासाठी विभागीय उपायुक्त (समाज कल्याण अधिकारी) राठोड साहेब, जिल्हा समाज कल्याण अधिकारी नाईकवाडे साहेब, विवेकराव आयाचित व लोकसेवा मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
या रक्तदान शिबिरासाठी परिवारातील अनेक सामाजिक, शेक्षणिक, धार्मिक संस्था व संघटना यांनी मदत केली यामध्ये प्रामुख्याने केशवराज विद्यालय, जनकल्याण निवासी विद्यालय,विवेकानंद रुग्णालय ,पुणे जनता बँक, सोलापूर जनता बँक, आस्था संकुल,अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व इतर अनेक संघटना रक्तदान शिबिरा मध्ये सहभागी झाले.



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा