पद्मश्री डॉ. शरदकुमार दिक्षित - एक लढवय्या


डॉ. शरदकुमार दिक्षित यांचा महाराष्ट्रातील पंढरपूर येथे एका सर्वसामान्य कुटुंबात १३ डिसेंबर १९३०रोजी जन्म  झाला.  शरदकुमार डॉक्टर झाल्यावर ते अमेरिकेत स्थायिक झाले  होते.
"सेवा है यज्ञ कुंड समिधा सम हम जले
ध्येय महासागर में सरित रूप हम मिले
लोकयोगक्षेम ही राष्ट्र अभय गान है
सेवारत व्यक्ति व्यक्ति कार्य का ही प्राण है"
डॉ. शरदकुमार दिक्षित यांचा सहवास लाभला ते म्हणजे भारतीय जैन संघटना व संचेती हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त पणे आयोजित मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिरात स्वयंसेवक म्हणून काम करत असताना. डॉक्टर म्हणजे देवदूतच होते. जे स्वतः लिरिक्स कर्करोगामुळे त्यांना बोलताही येत नव्हते. एका अपघातानंतर ते अर्धांगवायू झाला. यामध्ये त्यांचे अर्धशरीर अपंग झाले यामुळे ते चालू शकत नव्हते. तसेच त्यांना ह्रदयरोग झाला. यामध्ये मोठा आघात झाला. यामध्ये यांचे ह्रदय फक्त १२%कार्यरत होते. यामुळे नियमितपणे मशीनमधून ऑक्सिजन दिले जात होते. अशा अनेक अडचणीतून मार्ग काढत प्लास्टिक सर्जरीचे ऑपरेशन ते ८-१० तास सलगपणे करत असताना पाहिले.
 त्यांनी संपुर्ण भारतात सुमारे ३० वर्ष विनामुल्य शस्त्रक्रिया शिबिरातून लाखापेक्षा अधिक बालके/मुली यांच्या चह-यावर समाधान मिळवून देण्यासाठी कार्य केले.
म्हणून भारत सरकार ने २००१ मध्ये प्लास्टिक सर्जरी क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 तसेच अनेक वेळा नामनिर्देशित नोबेल शांतता पारितोषिकासाठी केले गेले.
अशा महामानवाच्या सहवासातून समाजसेवीची सकारात्मक ऊर्जा आयुष्यभर पुरेल ऐवढी मिळाली. अशा देवदूतांच्या सहवासात राहण्यासाठी मिळणे हेच भाग्यशाली.
यांचे दुर्दैवाने  निधन १४नोव्हेंबर २०११ रोजी न्यूयॉर्क मधील प्लशिंग येथे झाले.
"दीनहीन सेवा ही परमेष्टि अर्चना
केवल उपदेश नहीं कर्मरूप साधना
मानवाचा कर्मसे सदैव एकरूप हो
शिवसुंदर नवसमाज विश्ववन्द्य हम गढे"

     - दत्ता केशव माने (नाईचाकूर)
बीजेएस वसतीगृह माजी विद्यार्थी संघटन, वाघोली, पुणे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अखंड भारताच्या प्रेरणेचा झरा - शिवतीर्थ रायगड

*जनकल्याण निवासी विद्यालयाचा शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचा १०० टक्के निकाल*

शुद्ध भाषेमुळे आपले व्यक्तिमत्त्व फुलते - डॉ. सूर्यनारायण रणसुभे