मुलांनो तुमच्यासाठी.......

करोना विषाणू संसर्गामुळे शाळांना सुट्टया  लागल्याने पालकांनी ही याची काळजी घेऊन मुलांना घराबाहेर जाण्यास मज्जाव केला आहे. मुल घराबाहेर  म्हणजे समुहात खेळायला जाणे होते. यातून संसर्गजन्य स्थिती उदभवू नये.  मुलं दिवस भर घरात थांबून कंटाळवाणे होत असेल. 
 सुट्टीच्या कालावधीत नेहमी शिबिरे, विविध छंद वर्ग, शिबिरे, सहपरिवार सहली, संग्रहालये, प्रेक्षणीय ठिकाणे मुलांना दाखवणे असे नियोजन पालक करत असतील पण करोनाच्या संसर्गामुळे हे सर्व बंद केले. घराच्या बाहेर जायचे नाही म्हणून काय झाले आम्ही घरीच मुलांच्या व्यक्तीमत्व विकासासाठी अनेक कार्यक्रम/उपक्रम करून घेऊयात. 
 मुलांकडून अवांतर वाचन करून घेता येईल. तोचतोचपणा घालवण्यासाठी नेटवर मुबलक साहित्य  पीडीएफ च्या रूपात उपलब्ध आहे. अनेक गाजलेल्या कांदब-या, गूढकथा, प्रवास वर्णने, आत्मचरित्र, युद्ध कथा, तसेच अनुवादित साहित्य इ. प्रतिभावान लेखकांच्या  साहित्यांचा आस्वाद वाचकांना घेता येईल. छात्रप्रबोधन मासिकांचे दर्जेदार जुने अंक ही त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. 
 दररोज काही तरी लिहावे. आपले अनुभव, मुख्यमंत्री, पंतप्रधान, जिल्हाधिकारी, पोलिस, डॉक्टर यांना पत्र पाठवून कृतज्ञता व्यक्त करणे. कथा, प्रवास वर्णन, आपल्या घरातील व्यक्ती, मित्रा विषयी वर लेखन करता येईल. 
  १०वी व १२वीच्या मुलांनी पुढील कोणत्या विद्या शाखांसाठी प्रवेश घ्यायचा या विषयी माहिती शोधता येईल. तसेच विविध पर्यटन ठिकाणची माहिती शोधणे, पाहणे, तसेच इंटरनेट वर प्रचंड मनोरंजनासाठी मालिका, चित्रपट,नाटके आहेत. याचा आनंद घेता येईल. 
  
मुलांसाठी
- कागदापासून वस्तू तयार करणे. 
- अभ्यासाशी  संबंधित खेळ खेळणे
- आपली वंशावळ माहिती करून द्या.
- मारूती स्त्रोत, रामरक्षा, हनुमान चालीसा, हरिपाठ, पसायदान पाठ करून घेता येईल.
- नियमित घरात करता येतील अशी योगासने करून घ्या.
- मातीच्या वस्तू तयार करणे
- घरातील छोटी कामे करून घेणे. (वस्तू नीटनेटके ठेवणे, कचरा काढणे, छोटी भांडी घासणे, स्वतः चे कपडे धुणे इ.) 
-भाज्या निवडणे, सोलणे, वेगवेगळे पदार्थ तयार करणे. 
-  टाकाऊतून टिकाऊ वस्तू तयार करणे. 
-अभिवाचन (कथा, कविता, ललित लेख, संस्कारक्षम लेख) 
- वेगवेगळे चित्र काढणे. 
- युट्युब वरील अरविंद गुप्ता यांचे विज्ञान खेळणी दाखवणे व तयार करून घेणे
 या विविध उपक्रमातून मुलांना रमवून त्यांना कौशल्य संपन्न करत निरोगी आयुष्य जगू यात. 

               दत्ता केशवराव माने
       जनकल्याण निवासी विद्यालय हरंगुळ(बु)लातूर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अखंड भारताच्या प्रेरणेचा झरा - शिवतीर्थ रायगड

*जनकल्याण निवासी विद्यालयाचा शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचा १०० टक्के निकाल*

शुद्ध भाषेमुळे आपले व्यक्तिमत्त्व फुलते - डॉ. सूर्यनारायण रणसुभे