जनकल्याण निवासी विद्यालयाचे संगीत परिक्षेत घवघवीत यश
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या वतीने डिसेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या संगीत परीक्षेमध्ये जनकल्याण निवासी विद्यालयातील १३३ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
प्रारंभिक परिक्षेत ११ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले तर २१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. तर प्रवेशिका प्रथम परिक्षेत २३ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह तर १७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. प्रवेशिका पुर्ण परिक्षेत १विशेष प्राविण्यासह तर प्रथम श्रेणीत४१तर १७ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले.या विद्यार्थ्यांना हनुमंत पांचाळ सर यांनी शिक्षण दिले.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन विद्यालयाच्या वतीने प्रकल्प अध्यक्ष प्रकाशराव रायचूरकर, प्रकल्प कार्यवाह मधुकरराव कुलकर्णी, शालेय समिती अध्यक्ष उमेशराव सेलूकर,वसतीगृह समिती अध्यक्ष राजेशजी सुगरे ,मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सोनटक्के , प्रशासकीय अधिकारी रविंद्र पुर्णपात्रे,अधीक्षक शर्मिष्ठा कुलकर्णी,शिक्षक,पर्यवेक्षक यांनी केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा