*जनकल्याण निवासी विद्यालयाचा शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचा १०० टक्के निकाल*
लातूर ता. २९ जुलै (जनकल्याण वृत्तसेवा) :
हरंगुळ(बु) येथील जनकल्याण निवासी विद्यालयाचा शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचा १००टक्के निकालाची परंपरा कायम आहे. विद्यालयातील २२ विद्यार्थ्यांना ९० टक्यांपेक्षा अधिक गुण घेतले. तर५७ विद्यार्थ्यांनी ९० ते ८० टक्के मध्ये गुण संपादन केले आहेत. या परीक्षेसाठी८५ विद्यार्थी बसले होते. यातील विशेष प्राविण्यासह सर्व ८५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यालयातून चि. अक्षय श्रीधर वरेकर याने ९७ टक्के गुण घेत प्रथम, निवृत्ती बालाजी आलगुले याने ९६.६०टक्के गुण घेत व्दितीय, तर विद्यालयातून तृतीय व मुलीमधून प्रथम साक्षी संतोष कुटे हिने ९५.६० टक्के गुण घेत पटकाविला. या विद्यार्थ्यांचे तसेच दहावी प्रमुख सौ. माधुरीताई अंतरकर, सौ. दाक्षायणी भालेकर, पर्यवेक्षक बाबासाहेब मते, गुणवंत राठोड, विद्या कुलकर्णी यांचे प्रकल्प अध्यक्ष प्रकाशराव रायचुरकर, प्रकल्प कार्यवाह मधुकरराव कुलकर्णी, शालेय समिती अध्यक्ष उमेश सेलूकर, वसतीगृह समिती अध्यक्ष राजेश सुगरे,मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सोनटक्के, प्रशासकीय अधिकारी रवींद्र पुर्णपात्रे,अधीक्षक शर्मिष्ठा कुलकर्णी यांनी अभिनंदन व कौतुक केले.
Congratulations �� all the guys and teachers
उत्तर द्याहटवाStay home stay safe n healthy
Thank you
Congratulations
उत्तर द्याहटवा