जनकल्याण चा अभय शिरसाट राज्य स्पर्धेसाठी निवड
हरंगुळ (बु)
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय शालेय बुध्दिबळ स्पर्धा दि. ५ ऑक्टोबर २०१९ रोजी नांदेड येथे संपन्न झाल्या.
या स्पर्धेत जनकल्याण निवासी विद्यालयातील १७ वयोगटातील चि.अभय गंगाधर सिरसाट खेळाडूने विभागीय स्पर्धेत व्दितीय प्राविण्य मिळवले. १६,१७व १८आॕक्टोबरला खोपोली जि.रायगड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.
या स्पर्धेत लातूर विभागाचे नेतृत्व करणार आहे.
या विजयी खेळाडूस विनोद काळे यांनी मार्गदर्शन केले.
सर्व विजयी खेळाडू व मार्गदर्शकाचे विद्यालयाच्या वतीने अभिनंदन प्रकल्प अध्यक्ष प्रकाशराव रायचुरकर, कार्यवाह मधुकरराव कुलकर्णी, शालेय समिती अध्यक्ष उमेशजी सेलूकर, वसतिगृह समिती अध्यक्ष राजेशजी सुगरे, प्रशासकीय अधिकारी रविंद्र पुर्णपात्रे, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सोनटक्के, अधीक्षक शर्मिष्ठा कुलकर्णी, शिक्षक, पर्यवेक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी यांनी केले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा