जनकल्याण चे विभागीय योगासन स्पर्धेत यश

जनकल्याण चे  विभागीय योगासन स्पर्धेत यश

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे  व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय शालेय योगासन स्पर्धा दि. ३ ऑक्टोबर २०१९ रोजी जनता विद्यालय, येडशी येथे संपन्न झाल्या.
  या स्पर्धेत जनकल्याण निवासी विद्यालयातील  ५ खेळाडूनी प्राविण्य मिळवले. राज्यस्तरीय स्पर्धेत लातूर विभागाचे नेतृत्व करणार आहेत.
 यामध्ये १४ वयोगटात मुले :- वैभव राऊत तर १७ वयोगट मुले विष्णू मुंगळे,सुशांत माळेगावकर,अमोल चव्हाण तर मुली गौरवी भोसले  यांची राज्यस्तरीय योगासन  स्पर्धेसाठी निवड झाली. या विजयी खेळाडूस चन्नया स्वामी यांनी मार्गदर्शन केले.
सर्व विजयी खेळाडू व मार्गदर्शकाचे विद्यालयाच्या वतीने अभिनंदन प्रकल्प अध्यक्ष प्रकाशराव रायचुरकर, कार्यवाह मधुकरराव कुलकर्णी, शालेय समिती अध्यक्ष उमेशजी सेलूकर, वसतिगृह समिती अध्यक्ष राजेशजी सुगरे, प्रशासकीय अधिकारी रविंद्र पुर्णपात्रे, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सोनटक्के, अधीक्षक शर्मिष्ठा कुलकर्णी, शिक्षक, पर्यवेक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अखंड भारताच्या प्रेरणेचा झरा - शिवतीर्थ रायगड

*जनकल्याण निवासी विद्यालयाचा शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचा १०० टक्के निकाल*

शुद्ध भाषेमुळे आपले व्यक्तिमत्त्व फुलते - डॉ. सूर्यनारायण रणसुभे