जनकल्याण निवासी विद्यालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा
हरंगुळ (बु) :
जनकल्याण निवासी विद्यालयात वाचन प्रेरणा दिवस उत्साहात संपन्न करण्यात आला. विद्यार्थ्यामध्ये वाचनाची आवड व प्रेरणा निर्माण व्हावी म्हणून विद्यालयात मागील अनेक वर्षांपासून अवांतर वाचनासाठी विशेष प्रयत्न केले जातात. तसेच माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्मृतीतून प्रेरणा मिळावी. म्हणून वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात येतो.
या प्रसंगी मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सोनटक्के सर, हरिदास बाबळसुरे सर उपस्थित होते.
विद्यार्थी वर्षभर अवांतर पुस्तकांचे वाचन करतात. सर्वाधिक पुस्तकांचे वाचन करणा-या विद्यार्थ्यांचा पुस्तक देवून उत्तम वाचक म्हणून कौतुक करण्यात येते. यावर्षीच्या उत्तम वाचकांमध्ये ऋतुराज दारफळकर, श्रध्दा कळवंडे, स्नेहा थोरात, सुरज लवटे, श्रीगिता यादव, वैष्णवी शेळके, प्रियशा शिंदे, महेश कवडे, सायली शिंदे, वेदांत टेकाळे,स्नेहा फुलसे,तसेच शिक्षक- कर्मचारी वर्गातून चेतनाताई देशपांडे यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल दिनेश देशमुख यांनी केले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा