जनकल्याण चा शिक्षक-पर्यवेक्षकांसाठी अभ्यास वर्ग एक अग्रगण्य योजना



हरंगुळ (बु)लातूर येथील जनकल्याण निवासी विद्यालयातील कर्मचारी-कार्यकर्त्यासाठी मागील २० वर्षापासून प्रतीवर्षी निवासी अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात येते. याही वर्षी १९व २० ऑक्टोबर २०१९ रोजी अभ्यास वर्ग आयोजन केले आहे. या अभ्यास वर्गाचे उद्घाटन  रा. स्वं.संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांताचे संघटनमंत्री शरद भाऊ खाडिलकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रांत उपाध्यक्ष रमेशराव जोशी, शिक्षण आयामाचे प्रमुख वसंतराव फाटक, प्रांत सहकार्यवाह विनायकराव डंबीर हे उपस्थित राहणार आहेत.
 प्रकल्पात ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेतात. शिक्षण-समाज प्रबोधन-संस्कार या त्रिसूत्रीवर आधारित विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कार्यक्रम उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. या विकास कार्यात प्रकल्पात काम करणाऱ्या शिक्षक-पर्यवेक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. कोणत्याही शैक्षणिक प्रकल्पात तेथील विद्यार्थ्यांचा विकास हा त्या प्रकल्पातील कार्यरत कर्मचाऱ्यांच्या विकास पातळीवर अवलंबून असतो, याचा विचार करून येथील विद्यार्थी विकासात सहभागी शिक्षक-पर्यवेक्षकांना योग्य प्रशिक्षण मिळावे. योग्य दिशा मिळावी यासाठी मागील २० वर्षापासून दरवर्षी निवासी अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात येते.
   अशा अभ्यास वर्गातून कर्मचाऱ्यांना भारतीय शिक्षणाची उज्ज्वल परंपरा माहित व्हावी, भारतीय शिक्षणातील मुलभूत चिंतन  माहिती व्हावे. त्यांच्या कार्यासंबधीची त्यांची भूमिका स्पष्ट व्हावी, विद्यार्थी विकासकामातील अडीअडचणी ,समस्या दुर व्हाव्यात, एकमेकांनी केलेले विविध प्रयोग-विचार आदानप्रदान व्हावे, सामाजिक समस्यांची जाण निर्माण व्हावी, सामूहिक चिंतनशीलतेचा विकास व्हावा. सहवास्तव्यातून संघभावना निर्माण होवून त्यांच्या कार्यात इष्ट गती प्राप्त होवी,त्यांची कार्यदृष्टी विकसित होवून उद्याचा राष्ट्रभक्त विकसित नागरिक घडविण्यात त्यांचे योग्य ते योगदान लाभावे यासाठीच्या विविध विषयांची योजना केली जाते.
  अभ्यास वर्गातील विषयाचा आशय, तयारी, मांडणी यासाठी बाहेरील व्यक्ति न बोलावता २४ कार्यकर्ते-कर्मचाऱ्यांमध्येच विभागणी करून त्यांची अध्ययन शीलता वाढविण्यासाठी प्रयत्न केला जातो. अभ्यासवर्गातून अशा प्रकारच्या सातत्यपूर्ण रचनेमुळे अनेक कर्मचाऱ्यांना  विकसित होण्याची संधी मिळाली आहे. त्यांचे योगदान विद्यार्थी जडणघडणीत मन:पुर्वक लाभत असल्याचे अनुभवास येत आहे.
 यावर्षी ही १९व २० ऑक्टोबर दोन दिवसीय निवासी अभ्यास वर्गात शिक्षक-पर्यवेक्षक एकत्र व गटश: , वैचारिक, विचारप्रवर्तक विषयांची मांडणी केली जाणार आहे.
यामध्ये कर्मसिद्धान्त, अंतर्यात्रा, असे बौद्धिक वर्ग तर शिक्षक-पर्यवेक्षक भूमिका, वैदिक गणित, विद्यार्थ्याची ग्रहणशीलता, माझी अभ्यासिका, विद्यार्थी विकासातील प्रयोग, मूल्यांकन कार्यप्रणाली, विद्यार्थ्यांचा कल समजून घेताना, आपली मुलं, रविंद्रनाथ ची शाळा चे अभिवाचन आदि विषयावरील सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
या अभ्यास वर्गाचे आयोजन जनकल्याण निवासी विद्यालय प्रकल्पाच्या वतीने करण्यात आले होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अखंड भारताच्या प्रेरणेचा झरा - शिवतीर्थ रायगड

*जनकल्याण निवासी विद्यालयाचा शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचा १०० टक्के निकाल*

शुद्ध भाषेमुळे आपले व्यक्तिमत्त्व फुलते - डॉ. सूर्यनारायण रणसुभे