बालमित्र स्नेह मेळावा



*शिक्षकांनी राष्ट्र प्रगती साठी चरित्रसंपन्न आणि शिस्तबद्ध नागरिक घडविण्याचे कार्य करावे*
         - मा. लोखंडे गुरूजी

दि २९ ऑक्टोबर २०१९ रोजी भाऊबीजेच्या शुभमुहूर्तावर
तब्बल २० वर्षांनी जिल्हा परिषद प्रशाला नाईचाकूर च्या वर्गमित्राचे स्नेहमिलंन जगदंबा देवी भगतवाडी (नाईचाकूर) परिसरातील देवस्थानच्या सभागृहात पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मु अ श्री लोखंडे गुरुजी, तसेच श्री माळी गुरुजी श्री मगे गुरुजी श्री स्वामी गुरुजी यांच्या प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात जि प प्रशालेत सेवा केलेल्या आणि वर्गमित्रांना ज्ञानदान देणाऱ्या गुरुजनांचा सत्कार करून करण्यात आला गेल्या वर्षभरात ज्यांनी आप-आपल्या क्षेत्रात प्रगती केली त्यांचाही सत्कार करण्यात आला पोलीस निरीक्षक पदी निवड झालेले डॉ नारायण पालमपल्ले यांचाही सत्कार करण्यात आला यानंतर वर्गमित्राच ओळखीच सत्र ठेवण्यात आल होत. ओळख सत्रानंतर बहुतांश जणांनी बालपणीच्या आणि शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला, तसेच अडचणीत सर्वांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन सहकार्य करावे ह्या मुख्य हेतुवर एकमत झाल्यानंतर, सचिन माळी, डॉ नारायण  पालमपल्ले, सारिका झिंगाडे, रुक्मिणी माने, सावित्रा पवार आदींनी आपली मनोगत व्यक्त केली .
मार्गदर्शन पर भाषणात बोलतांना श्री लोखंडे गुरुजी म्हणाले की, *"ज्ञानदान करत असतांना छोट्या-छोट्या गोष्टीकडे लक्ष देऊन त्या शिस्तबद्ध पद्धतीने विद्यार्थ्यांकडून करून घ्यायचो जर नाही केले तर शिक्षा करायचो याच तुम्हाला वाईट वाटल असेल पण राष्ट्र निर्मितीसाठी गुणवान, शिस्तबद्ध आणि चारित्र्य संपन्न युवा तयार व्हावा आणि तो युवा राष्ट्राचा आधार बनावा हाच त्यामागचा शुद्ध हेतू होता कारण जग आजही भारताकडे सांस्कृतिक दृष्ट्या आदरांने पाहत, त्यामुळे आपण सर्वांनी स्वदेशी हिताला महत्त्व द्यावे आणि आदर्श भारतीय व्हावे आणि विशेषतः आपण सर्वांनी वेळेला महत्त्व द्यावे कारण सर्वात अनमोल ही वेळ आहे"* अस मत यावेळी व्यक्त केले !
या कार्यक्रमास जवळपास ४० वर्गमित्र उपस्थित होते, कार्यक्रमाच सूत्रसंचलन सिद्धेश्वर माने तर यांनी तर प्रास्ताविक डॉ माधव माने केले, आभार दत्ता माने यांनी व्यक्त केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  बाळु पवार, हरी पाटील, मारुती पालमपल्ले, लक्ष्मण पवार, अभिमन्यु पवार, रेणुका लकडे, यशोदा पवार, आदींनी पुढाकार घेतला !

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अखंड भारताच्या प्रेरणेचा झरा - शिवतीर्थ रायगड

*जनकल्याण निवासी विद्यालयाचा शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचा १०० टक्के निकाल*

शुद्ध भाषेमुळे आपले व्यक्तिमत्त्व फुलते - डॉ. सूर्यनारायण रणसुभे