जनकल्याण चा अक्षय वरेकर राज्य स्पर्धेसाठी निवड


हरंगुळ (बु)
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय शालेय मैदानी स्पर्धा दि. १२ नोव्हेंबर २०१९ रोजी लातूर येथे संपन्न झाल्या. 
  या स्पर्धेत जनकल्याण निवासी विद्यालयातील १७ वयोगटातील चि.अक्षय श्रीधर वरेकर खेळाडूने विभागीय  भालाफेक स्पर्धेत व्दितीय प्राविण्य  प्राप्त करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी संघात स्थान मिळवले. 
या स्पर्धेत लातूर विभागाचे नेतृत्व करणार आहे.
  या विजयी खेळाडूस मारूती खोत यांनी मार्गदर्शन केले.
सर्व विजयी खेळाडू व मार्गदर्शकाचे विद्यालयाच्या वतीने अभिनंदन प्रकल्प अध्यक्ष प्रकाशराव रायचुरकर, कार्यवाह मधुकरराव कुलकर्णी, शालेय समिती अध्यक्ष उमेशजी सेलूकर, वसतिगृह समिती अध्यक्ष राजेशजी सुगरे, प्रशासकीय अधिकारी रविंद्र पुर्णपात्रे, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सोनटक्के, अधीक्षक शर्मिष्ठा कुलकर्णी, शिक्षक, पर्यवेक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अखंड भारताच्या प्रेरणेचा झरा - शिवतीर्थ रायगड

*जनकल्याण निवासी विद्यालयाचा शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचा १०० टक्के निकाल*

शुद्ध भाषेमुळे आपले व्यक्तिमत्त्व फुलते - डॉ. सूर्यनारायण रणसुभे