जनकल्याणच्या खेळाडू चे जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेत यश



जनकल्याणच्या खेळाडू चे जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेत यश
हरंगुळ (बु)
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धा दि. २० नोव्हेंबर २०१९ रोजी लातूर येथील श्री श्री रविशंकर विद्यालयात संपन्न झाल्या.
  या स्पर्धेत जनकल्याण निवासी विद्यालयातील १४वयोगट स्पर्धेत मुली (रोप) सिध्दी सुरेश यादव, निकिता नामदेव भोसले, स्नेहा महादेव थोरात, मानसी व्यंकट मते तर मुले(मल्लखांब) रूद्र पाटिल, ज्ञानेश्वर थोरबोले,अमर काडगावे तर १७वयोगटातून मुली(रोप) गीता व्यंकट मते, संस्कृती विक्रम खदगाये, आरती आश्रुबा भोरे,कल्याणी शिवाजी मस्के, तर मुलांमधून ज्ञानदीप कदम, प्रसाद पाटिल, कृष्णा सुरवसे यांची  विभागीय स्पर्धेसाठी लातूर जिल्हा संघात स्थान मिळवले.
लातूर विभागीय मल्लखांब या स्पर्धेत लातूर जिल्हाचे नेतृत्व करणार आहे.
  या विजयी खेळाडूस बाहुबली भस्मे यांनी मार्गदर्शन केले.
सर्व विजयी खेळाडू व मार्गदर्शकाचे विद्यालयाच्या वतीने अभिनंदन प्रकल्प अध्यक्ष प्रकाशराव रायचुरकर, कार्यवाह मधुकरराव कुलकर्णी, शालेय समिती अध्यक्ष उमेशजी सेलूकर, वसतिगृह समिती अध्यक्ष राजेशजी सुगरे, प्रशासकीय अधिकारी रविंद्र पुर्णपात्रे, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सोनटक्के, अधीक्षक शर्मिष्ठा कुलकर्णी, शिक्षक, पर्यवेक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अखंड भारताच्या प्रेरणेचा झरा - शिवतीर्थ रायगड

*जनकल्याण निवासी विद्यालयाचा शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचा १०० टक्के निकाल*

शुद्ध भाषेमुळे आपले व्यक्तिमत्त्व फुलते - डॉ. सूर्यनारायण रणसुभे