व्हॅलेंटाईन डे चे सत्य
अनेक वर्षांपासून शाळा, महाविद्यालयीन युवक -युवती मोठा प्रमाणात हा दिवस साजरा करण्यात धन्यता मानतात. आपल्याला प्रिय वाटणा-या व्यक्ति ला गुलाबाचे फुल देऊन त्याच्यावरील प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणून साजरा करतात. पण वास्तव वेगळेच आहे. काही वर्षांपूर्वी दैनिकात वाचनात आले होते.
ही गोष्ट रोमन साम्राज्य होते त्या वेळची आहे. त्या काळी रोमन सैनिक जगातील विविध देशात युध्दासाठी जात असत. यामुळे सैनिकाचे लग्न होत नसत. युवक सैनिक असल्यामुळे लग्न होणे कठीण होत असे. काही सैनिक अस्वस्थ होत आणि वाईट मार्गाला लागत होते. ही बाब व्हॅलेंटाईन नावाच्या धर्म गुरूच्या लक्षात आले. अशा अनुरूप मुलीच्या शोध घेऊन अशा सैनिकांचे लग्ने जमवून दिली. हे सैनिक कुटुंबे सुखी राहू लागले. म्हणून अशा जोडप्यांनी व्हॅलेंटाईन यांचा जन्मदिन 'सेंट व्हॅलेंटाईन ' म्हणून साजरा करू लागले.
या दिवशी आपल्या जोडप्याला गुलाबाचे फुल देऊन साजरा केला जाणारा हा दिवस आजचे युवक साजरा करण्यात धन्यता मानत आहेत.
आजच्या युवा वर्गाने हा दिवस आपण कोणाच्या स्मरणार्थ करतोय. हा दिवस का साजरा करतोय तसेच या दिवसाचे प्रेमी जगताचा काय संबंध आहे?
युवकांनी आदर्श घ्यावा तर प्रभू श्री रामाचा, श्रीकृष्ण, महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, भगतसिंग, राजगरू, बाबासाहेब आंबेडकर यांचा घ्या.
दत्ता के माने.
हरंगुळ(बु), लातूर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा