विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे केंद्र जनकल्याण निवासी विद्यालय - सुरेशजी पाटील
हरंगुळ(बु) जनकल्याण निवासी विद्यालयातील विविध कार्यक्रम, उपक्रमातून विद्यार्थ्याचा सर्वांगिण विकास होत असतो. म्हणून येथे प्रविष्ट विद्यार्थी हा भाग्यवान आहे . असे प्रतिपादन वार्षिकोत्सव उद्घाटन प्रसंगी संवेदना प्रकल्पाचे कार्यवाह सुरेश दादा पाटील यांनी केले.
जनकल्याण निवासी विद्यालयाचा २६वा वार्षिकोत्सव कार्यक्रमाच्या उदघाटन कार्यक्रमासाठी व्यासपीठावर वार्षिकोत्सवाचे उदघाटक भांजीभाई पटेल(सरस्वती सॉ मिल, लातूर) पुणे जनता बॅक शाखा अधिकारी मनोजजी मेंडजोगी, जनकल्याण समिती प्रांत उपाध्यक्षा पद्माताई कुबेर, प्रमुख वक्ते सुरेश पाटील, प्रकल्पाध्यक्ष प्रकाशराव रायचूरकर, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सोनटक्के, प्रशासकीय अधिकारी रविंद्र पूर्णपात्रे, अधीक्षक शर्मिष्ठा कुलकर्णी, वार्षिकोत्सव प्रमुख रघुनाथ पाटील होते.
यावेळी प्रमुख अतिथीं च्या हस्ते विज्ञान - चित्रकला , ग्रंथ, उपक्रम तसेच गणितीय खेळणी व रांगोळीतून गणिताच्या विविध गोष्टी चे रेखांकित केलेल्या प्रदर्शनी चे उदघाटन करण्यात आले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री पाटिल म्हणाले की, निवासी विद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध करून दिल्या जातात. याचे सोने केले पाहिजे. शालेय जीवनात येथील दिनचर्या कठिण वाटते. पुढील आयुष्यात याचाच उपयोग होतो. असे जनकल्याण च्या माजी विद्यार्थ्यांची उदाहरणे देवून सांगितले.
धाडस, आत्मविश्वास, अनेक प्रेरणादायी कार्यक्रम, संस्कार येथील सहवासातून निर्माण होते असे मत व्यक्त केले.
१०वी स्वयंशासन कालावधीत उत्कृष्ट पणे कार्य केले म्हणून प्रथमेश खरात, शुभम शिंदे, निकिता कवडे, आरतीदळवे या विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला.
वार्षिकोत्सव उदघाटक श्री भांजीभाई पटेल यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी जनकल्याण समिति महाराष्ट्र प्रांत उपाध्यक्ष रमेशराव जोशी, प्रांत संघटनमंत्री शरदभाऊ खाडिलकर, संवेदना प्रकल्प अध्यक्ष डॉ. राजेश पाटिल, प्रकल्प कार्यवाह मधुकरराव कुलकर्णी, शालेय समिती अध्यक्ष उमेशराव सेलूकर,वसतिगृह समिती अध्यक्ष राजेश सुगरे,प्रशांतजी मेतकुटे, वसंतराव नायगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन चि.सार्थक पवार(८वी)कु.रेणुका कदम(९वी)तर प्रास्ताविक रघुनाथ पाटील यांनी केले. तर आभार चि.सार्थक पवार यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अभ्यासपुरक मंडळाचे रघुनाथ पाटील, हरिदास बाबळसुरे, मन्मथ खिचडे,दत्ता माने यांनी प्रयत्न केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा