विद्यार्थी मित्रांनो प्रशासकीय यंत्रणेत जा- जिल्हा परिषद अध्यक्ष राहूल केंद्रे

हरंगुळ बु येथील जनकल्याण निवासी विद्यालयाच्या वार्षिकोत्सवातील कलाविष्कार कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष राहूल केंद्रे बोलत होते की, प्रशासकीय यंत्रणेत काम करण्यासाठी अभ्यास करून मोठे व्हा.तसेच विविध कलागुणांना व्यासपीठ मिळवून देवून जोपासना केली पाहिजे आणि जनकल्याण विद्यालयाने सांस्कृतिक कलाविष्कारात वेगळे पण निर्माण केले आहे म्हणत कौतुक  केले. 
व्यासपीठावर विनोदवीर बालाजी सुळ,प्रकल्प अध्यक्ष प्रकाशराव रायचुरकर, वसतिगृह समिती अध्यक्ष राजेश सुगरे, वार्षिकोत्सव प्रमुख रघुनाथ पाटील उपस्थित होते. 
 महाराष्ट्राचा विनोदवीर बालाजी सुळ यांनी मनोगत व्यक्त केले. 
सांस्कृतिक कार्यक्रमात विविध प्रकारच्या ११ कला प्रकाराचे सादरीकरण करण्यात आले. 
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रघुनाथ पाटील, हनुमंत पांचाळ, नरसिंग सुरवसे,विद्या कुलकर्णी, अपर्णाताई  शिलवंत , प्रदिप मुसांडे यांनी प्रयत्न केले. 
कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये विविध ११ कला प्रकार सादर करण्यात आले.कलाविष्कार मधील मर्द मराठा गीतावरील नृत्य, पोवाडा, गोंधळी गिताचे सादरीकरण केले. 
कार्यक्रमाचे सांगता पसायदानाने झाले. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदिप मुसांडे, श्री रघुनाथ पाटील सर यांनी केले तर प्रास्ताविक हनुमंत पांचाळ सर तर आभार श्रीमती विद्या कुलकर्णी  यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अखंड भारताच्या प्रेरणेचा झरा - शिवतीर्थ रायगड

*जनकल्याण निवासी विद्यालयाचा शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचा १०० टक्के निकाल*

शुद्ध भाषेमुळे आपले व्यक्तिमत्त्व फुलते - डॉ. सूर्यनारायण रणसुभे