जागतिक मराठी भाषा दिन

२७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे कुसुमाग्रजांचा जन्मदिन आहे. हाच दिवस मराठी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. यासाठी मराठी अकादमी ने पुढाकार घेतला. कुसुमाग्रजांचे विपुल साहित्य आहे. याचाच गौरव म्हणून आहे. 
 जगातील अनेक भाषेचा जन्म हा संस्कृत भाषेपासून झाला आहे. आपली मराठी भाषा देखिल संस्कृत भाषेमधून निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील जनतेला मराठी मायबोली वाटते. 
मराठी भाषा एकच आहे पण दर बारा कोसावर भाषेत बोलण्याची पद्धत वेगळी जानवते. मराठवाड्यातील वेगळी, कोकणातील कोकणी, खानदेश तील आयराणी तसेच जिल्हा जिल्ह्यातील भाषेत बदल दिसतो. 
   पण आता शालेय अभ्यासक्रमात जसे सेमी माध्यमातून अर्ध्य  इंग्रजी व अर्ध्य मराठी या प्रमाणे मराठी भाषेचे होत आहे. बोली भाषेत सुध्दा इंग्रजी, हिंदी शब्दाचा वापर वाढला आहे. 
समाजमाध्यमावर संवाद करताना इंग्रजीतून मराठी बोलली जाते. तेही अर्ध्यवट शब्दाचा वापर केला जात आहे. 
मराठी भाषिक प्रांतात मराठी बोला, लिहा चळवळ काढावी लागते या पेक्षा दूरभाग्य काय असु शकते. अन्य भाषा नक्की शिकल्या पाहिजे. अनेक भाषेतून ज्ञान घेतले पाहिजे. पण त्या त्या भाषेचा सन्मान पण नक्की ठेवला पाहिजे. 
 आपण काय करू शकतो. मराठी पुस्तके, वर्तमान पत्र, मराठी भाषेतील कथा वाचन केले पाहिजे. असे साहित्य भेट दिले पाहिजे. 
 मराठी भाषेतील समृद्ध साहित्य, साहित्यिक यांच्या साहित्यात रममाण झाले पाहिजे. 
   दत्ता केशवराव माने
हरंगुळ बु लातूर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अखंड भारताच्या प्रेरणेचा झरा - शिवतीर्थ रायगड

*जनकल्याण निवासी विद्यालयाचा शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचा १०० टक्के निकाल*

शुद्ध भाषेमुळे आपले व्यक्तिमत्त्व फुलते - डॉ. सूर्यनारायण रणसुभे