जनकल्याण निवासी विद्यालयात वार्षिकोत्सवाचे आयोजन
हरंगुळ(बु) येथील जनकल्याण निवासी विद्यालयाचा २६वा वार्षिकोत्सव येत्या ७,८व ९ फेब्रुवारी २०२० रोजी संपन्न होणार आहे. वार्षिकोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात चित्रकैला, विज्ञान, ग्रंथ तसेच विद्यार्थ्यांनी तयार केलेले विविध उपक्रम, व सेवा प्रकल्पाच्या प्रदर्शनीचे उदघाटन केले जाणार आहे. ग्रामीण भागात खेळल्या जाणा-या खेळांचे "खेळ यात्रा" म्हणून आयोजन केले आहे. काव्य संध्या, वक्तृत्व, कथाकथन, वर्गश:पद्य पाठांतर, कलाविष्कार कार्यक्रम अशा विविध लक्षवेधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
७ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ९.००वा. वार्षिकोत्सवाचे उद्घाटन मा. श्री. भांजीभाई पटेल(सरस्वती सॉ मिलचे संचालक) यांच्या हस्ते होणार आहे. तर विद्यार्थ्यांना मा. श्री. सुरेशजी पाटील (कार्यवाह,संवेदना प्रकल्प,लातूर)मार्गदर्शन करणार आहेत. तसेच विज्ञान मंडळ व चित्रकला मंडळाच्या वतीने "पर्यावरण जागृती " म्हणून चित्र प्रदर्शनी, ग्रंथ, विद्यार्थ्यांनी तयार केलेले विविध साहित्य निर्माण केलेले प्रदर्शनी उद्घाटन होणार आहे.
दुपारी ३:०० वाजता ग्रामीण भागात पूर्वी खेळल्या जाणाऱ्या विविध २७ खेळांचे आयोजन केले आहे. सायंकाळी ७:००वा.काव्य संध्या ही स्पर्धा दोन गटात आयोजित करण्यात आली आहे.
८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९:०० वाजता विद्यालयातील संपूर्ण विद्यार्थ्यांचा सहभाग असलेली स्पर्धा " वर्गश: पद्य पाठांतर " संपन्न होणार आहे. दुपारी २:३० वा. ५वी ते ७वी वर्गासाठी कथाकथन तर ८वी ,९वी साठी वक्तृत्व स्पर्धा संपन्न होणार आहे. सायंकाळी ७:०० वाजता कलाविष्कार कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्राचा विनोदवीर श्री.बालाजी सुळ यांच्या हस्ते करण्यात येणार असून प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष राहूल जी केंद्रे उपस्थित राहणार आहेत. ९ फेब्रुवारी ला सकाळी ११:०० वाजता वार्षिकोत्सव समारोप कार्यक्रम संपन्न होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून दोंडाईचा येथील हस्ती पब्लिक स्कूल चे संचालक कैलास जी जैन,माजी आय. टी कमिश्नर संतोष जी साहू हे उपस्थित राहणार आहेत. रा. स्व. संघ देवगिरीचे मा. प्रांत संघचालक मधुकरराव जाधव(दाजी) मार्गदर्शन करणार आहेत.
जनकल्याण निवासी विद्यालय प्रकल्प अध्यक्ष प्रकाशराव रायचूरकर, प्रकल्प कार्यवाह मधुकरराव कुलकर्णी , तसेच मुख्याध्यापक,प्रशासकीय अधिकारी,अधीक्षक व वार्षिकोत्सव समितीच्या वतीने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा