जनकल्याणच्या प्रदीप मुसांडे व हनुमंत पांचाळ यांना ' राष्ट्रशिल्पकार पुरस्कार ' प्रदान



हरंगुळ (बु) :
        लातूर येथील रोटरी क्लबच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त कोजागिरी पौर्णिमेला शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी जनकल्याण निवासी विद्यालयाचे प्रदीप मुसांडे व हनुमंत पांचाळ या दोघांचा लातूर रोटरी क्लबचे अध्यक्ष श्रीरामजी देशपांडे, हरिषजी मोटवाणी, हरिप्रसाद सोमाणी,डॉ.विनोद लड्डा यांच्या हस्ते ' राष्ट्रशिल्पकार पुरस्कार ' देवून सन्मान करण्यात आला.
प्रदीप मुसांडे यांनी  हिंदी भाषेवरील विद्यार्थ्यासाठी केलेले विविध प्रयोग,सुत्रसंचालन, निवेदन अनेक कार्यक्रमात प्रभावीपणे केलेले आहे.  तसेच क्रीडा क्षेत्रात कबड्डीचे प्रशिक्षक व राज्य पंच म्हणून त्यांनी भरीव कामगिरी केली आहे . तर हनुमंत पांचाळ यांनी संगीत क्षेत्रात अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयच्या वतीने घेतल्या जाणा-या विविध परिक्षेसाठी प्रशिक्षण देवून १२०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षीत केले आहे . या योगदानाबद्दल हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे .
 पुरस्कार मिळाल्यामुळे विद्यालयाच्या वतीने प्रकल्प अध्यक्ष प्रकाशराव रायचुरकर, कार्यवाह मधुकरराव कुलकर्णी, शालेय समिती अध्यक्ष उमेशजी सेलूकर, वसतिगृह समिती अध्यक्ष राजेशजी सुगरे, प्रशासकीय अधिकारी रवींद्र पुर्णपात्रे, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सोनटक्के, अधीक्षक शर्मिष्ठा कुलकर्णी
यांनी त्यांचे अभिनंदन केले.

टिप्पण्या

  1. Congratulations sir ....we are so luck, that we got such teachers ...full respect sir ....
    Once again congratulations....

    उत्तर द्याहटवा
  2. शुभेच्छा.
    प्रदिपजी मुसांडेसर व हनुमंतजी पांचाळसर💐💐💐

    उत्तर द्याहटवा
  3. हणमंत पांचाळ व मुसांडे सरांचे हार्दिक अभिनंदन

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अखंड भारताच्या प्रेरणेचा झरा - शिवतीर्थ रायगड

*जनकल्याण निवासी विद्यालयाचा शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचा १०० टक्के निकाल*

शुद्ध भाषेमुळे आपले व्यक्तिमत्त्व फुलते - डॉ. सूर्यनारायण रणसुभे