समाजाची बांधिलकी जपून काम करणारे जनकल्याण निवासी विद्यालय-प्रांत संघचालक मधुकरराव जाधव

हरंगुळ (बु) समाजाची बांधिलकी जपून काम करणारे हे जनकल्याण निवासी विद्यालय आहे. यातून तयार होणारे विद्यार्थी हे या राष्ट्राचा वैभव होऊन रोजगार न घेता रोजगार देणारे व्हा. येथील शिक्षणातून सक्षम, स्वालबनामधून  अहंकार, नैराश्य, दूर होते. तसेच संवेदनशील माणुस म्हणुन आपले व्यक्तीमत्त्व घडवण्याची व्यवस्था केली जाते असे जनकल्याण निवासी विद्यालयातील वार्षिकोत्सव समारोप कार्यक्रमात व्यक्त केले.
जनकल्याण निवासी विद्यालयाच्या वार्षिकोत्सव समारोप कार्यक्रमाच्या
व्यासपीठावर प्रमुख अतिथी नॅचरल समुहाचे बी. बी. ठोंबरे, मुंबई चे माजी आयकर आयुक्त संतोष जी साहू, रा. स्व. संघाचे देवगिरी प्रांत संघचालक मधुकरराव जाधव(दाजी), प्रांत उपाध्यक्ष रमेशराव जोशी,   प्रकल्प अध्यक्ष प्रकाशराव रायचूरकर, प्रकल्प कार्यवाह मधुकरराव कुलकर्णी, प्रशासकिय अधिकारी रविंद्र पुर्णपात्रे, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सोनटक्के, अधिक्षक शर्मिष्ठा कुलकर्णी ,वार्षिकोत्सव प्रमुख रघुनाथ पाटील  उपस्थित होते.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आपले मनोगत व्यक्त करताना श्री ठोंबरे म्हणाले भारतीय शिक्षण देणारे हे विद्यालय आहे. येथील शिक्षणातून संस्कार, शिस्त यातून समाज, देश घडविण्यासाठी विद्यार्थी निर्माण करण्याचे काम केले जाते. ग्रामीण भागातील शाळानी आदर्श घेऊन अनुकरण केले पाहिजे. तसेच संतोष जी साहू यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थी मित्रांनो आपण आपले कुटुंब तसेच विद्यालयाचे सदैव ऋणी रहा तसेच एक उत्तम नागरिक व्हा. असे मत व्यक्त केले
यावेळी विशेष सत्कार २०१०ला शालांत परिक्षा उत्तीर्ण विद्यार्थी श्रीहरी कनकदंडे हा नुकताच न्यायाधीश म्हणून महाराष्ट्रात १६वा आल्यामुळे विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.तसेच काव्य वाचन, वक्तृत्व,कथाकथन,समुहगान,व कलाविष्कार मधील उत्कृष्ट कलाकार म्हणून ओमकार उफाडे,दिपाली शिंदे, रागिनी गायकवाड, मधुरा बंडगर,संकेत राखुंडे, यशवंत जगताप, चित्रकलेच्या निखिल गायकवाड तसेच निवृत्ती आलगुले यांचा सत्कार करण्यात आले. 
यावेळी प्रांत उपाध्यक्षा पद्माताई कुबेर, प्रांत संघटन मंत्री शरद भाऊ खाडिलकर, संवेदना प्रकल्प अध्यक्ष डॉ राजेश पाटील,वसतिगृह समिती अध्यक्ष राजेश सुगरे तसेच लातूर शहरातील जेष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते. 
तसेच तीन दिवस झालेल्या विविध कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये काव्य वाचन, व कलाविष्कार मधील मर्द मराठा गीतावरील नृत्य, पोवाडा, गोंधळी गिताचे सादरीकरण केले. 
कार्यक्रमाचे सांगता पसायदानाने झाले. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. माधुरीताई अंतरकर, श्री हरिदास बाबळसुरे सर यांनी केले तर प्रास्ताविक मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सोनटक्के सर तर परिचय प्रशासकीय अधिकारी रवींद्र पुर्णपात्रे यांनी केले. 
यासाठी वार्षिकोत्सव समितीचे हरिदास बाबळसुरे, रघुनाथ पाटील, मन्मथ खिचडे ,दत्ता माने तसेच जनकल्याण निवासी विद्यालयातील विविध मंडळाने यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अखंड भारताच्या प्रेरणेचा झरा - शिवतीर्थ रायगड

*जनकल्याण निवासी विद्यालयाचा शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचा १०० टक्के निकाल*

शुद्ध भाषेमुळे आपले व्यक्तिमत्त्व फुलते - डॉ. सूर्यनारायण रणसुभे